Loksabha Election Result: ठाकरेंच्या शिलेदारांची विजयी घौडदौड! नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना धक्का; राजाभाऊ वाजे, ओमराजेंची निर्णायक आघाडी!

Maharashtra Loksabha Nivdnuk Nikal 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी पाहायला मिळत आहे.
 Loksabha Election Result: ठाकरेंचे शिलेदार सुसाट! नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना धक्का; राजाभाऊ वाजे, ओमराजेंची निर्णायक आघाडी!
Nashik Lok Sabha Election Candidates Hemant Godse Vs Rajabhau Vaje Vs Shantigiri MaharajSaam TV

नाशिक, ता. ४ जून २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे पहिल्या मतमोजणीतील कल समोर येत आहेत. पहिल्या कलांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेत महायुतीला धक्का दिला आहे. उमेदवारीच्या घोळामुळे चर्चेत आलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघातही शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसे यांच्यावर मात करत निर्णायक आघाडी घेतली आहे.

नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन महायुतीमध्ये मोठा कलह पाहायला मिळाला होता. अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र नाशिकच्या निवडणुकीत हेमंत गोडसेंची जादू फिकी पडल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

दहाव्या फेरीअखेर राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 94 हजार 735 मतांची निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज भरत टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचाही करिष्मा चालला नसल्याचे दिसत आहे.

 Loksabha Election Result: ठाकरेंचे शिलेदार सुसाट! नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना धक्का; राजाभाऊ वाजे, ओमराजेंची निर्णायक आघाडी!
Baramati Loksabha: बारामतीत सुप्रिया सुळेंचे पारडे जड! सुनेत्रा पवार पिछाडीवर; कार्यकर्त्यांचा जल्लोष

दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदार संघातही शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांना जोरदार टक्कर देत सातव्या फेरी अखेर ८८ हजार ५०४ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांचाही विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

 Loksabha Election Result: ठाकरेंचे शिलेदार सुसाट! नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना धक्का; राजाभाऊ वाजे, ओमराजेंची निर्णायक आघाडी!
Kalyan Thane Loksabha Election : कल्याणसह ठाण्यामध्ये शिंदे गटाची मोठी मुंसडी; श्रीकांत शिंदे अन् नरेश म्हस्के आघाडीवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com