Election Commission Local Body News Saam TV
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान, उमेदवारी अर्जांच्या छाणनीनंतर 317 अर्ज ठरले वैध

Maharashtra Loksabha Election 2024: राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात ३६१ उमेदवारांनी ५२२ अर्ज दाखल झाले होते.

Priya More

देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) धामधूम सुरू आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाणनी प्रक्रियेनंतर ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. एकूण ५२२ उमेदवारांचे अर्ज आले होते. यापैकी ३१७ उर्ज वैध ठरले असून इतर अर्ज अवैध ठरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात ३६१ उमेदवारांनी ५२२ अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाणनी प्रक्रिया नुकताच पार पडली. अर्जांची छाणनी केल्यानंतर एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघात २१, बारामती लोकसभा मतदारसंघात ४६ , उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ३५, लातूर लोकसभा मतदारसंघात ३१, सोलापूर लोकसभा मतदारसंघात ३२, माढा लोकसभा मतदारसंघात ३८, सांगली लोकसभा मतदारसंघात २५, सातारा लोकसभा मतदार संघात २१, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ९, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २७ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ३२ उमेदवारांचे असे एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

दरम्यान, राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये आपआपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. त्यासाठी राज्यभर सभा, रॅली आणि बैठकांचा धडाका सुरू आहे. अनेक पक्षांच्या स्टार प्रचारक आणि बड्या नेत्यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT