Ram Satpute News: मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत फेटा बांधणार नाही; भाजप आमदार राम सातपुतेंचा संकल्प!

BJP Candidate Ram Satpute On Maratha Reservation: 'जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही,' असा संकल्प सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे.
Ram Satpute
Ram SatputeSaam TV

सोलापूर,|ता. २१ एप्रिल २०२४

'जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही,' असा संकल्प सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना राम सातपुते यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजप आमदार राम सातपुते यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळत आहे. आज भगवान महावीर जयंती निमित्त सोलापुरात जैन बांधवान कडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम सातपुते उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले राम सातपुते?

"मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांसमोर मी संकल्प केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटत नाही, मार्गी लागत नाही. तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी फेटा घालणार आहे," असे राम सातपुते यावेळी म्हणाले.

Ram Satpute
Manipur Lok Sabha Election 2024: मतदानादरम्यान गोळीबार आणि हाणामारीची घटना, मणिपूरच्या 11 बूथवर 22 एप्रिलला पुन्हा होणार मतदान

"हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची फैयाज शेख नामक जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली. या घटनेचा मी निषेध करतो. तसेच मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मशिदीतून फतवे काढून संविधानाला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत," असा आरोपही यावेळी राम सातपुतेंनी केला.

Ram Satpute
Manoj Jarange Latest News : खुल्या मतदारसंघात ओबीसी उमेदवारांना उभे का राहायचे आहे? मनोज जरांगे यांचा सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com