Manoj Jarange Latest News : खुल्या मतदारसंघात ओबीसी उमेदवारांना उभे का राहायचे आहे? मनोज जरांगे यांचा सवाल

Manoj Jarange News : या निवडणुकीत राज्यातील खुल्या मतदारसंघात अनेक ओबीसी उमेदवारांसहिंत इतर प्रवर्गातील लोक प्रतिनिधींनी अर्ज भरला आहे. मात्र, यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Manoj Jarange Patil Latest News
Manoj Jarange Patil Latest News Saam TV

परभणी : देशासहित राज्यात सर्वत्र लोकसभेची धामधूम पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे पडला आहे. या निवडणुकीत राज्यातील खुल्या मतदारसंघात अनेक ओबीसी उमेदवारांसहिंत इतर प्रवर्गातील लोक प्रतिनिधींनी अर्ज भरला आहे. मात्र, यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मनोज जरांगे हे परभणीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादम्यान मनोज जरांगे यांनी एका जाहीर कार्यक्रमात आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.'सर्वच राजकीय पक्षांनी मला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आवाहन केले होते. मी लोकसभा निवडणुकीत उभा राहिलो असतो, तर प्रचंड मतांनी निवडून आलो असतो. पण मला मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे मी मूळ प्रश्नापासून दूर जाणार नाही, असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil Latest News
Maharashtra Water Crisis: नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त, जनता हंडाभर पाण्यासाठी त्रस्त; ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई

आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना जरांगे म्हणाले की, 'मराठा समाज ओबीसीमधून आरक्षण मागत असताना ओबीसींचे सर्वच नेते मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेऊ नका म्हणून विरोध करत होते. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसीमधून नको असेही म्हणत होते. मग आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खुला मतदारसंघ असताना ओबीसी नेत्यांना येथून का उभे राहायचे आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Manoj Jarange Patil Latest News
Dr. Jyoti Mete : मोठी बातमी! शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

तत्पूर्वी, सध्या मराठवाड्यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीमधून महादेव जानकर हे ओबीसी उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. ज्याला पाडायचे त्याला पाडा, पण तो पुन्हा कधी उभा राहता कामा नये, असेही जरांगे पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com