Dr. Jyoti Mete : मोठी बातमी! शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

Lok Sabha Election : शरद पवार आणि आमच्यात कुठं काय खटकलं? हे मला सांगता येणार नाही, असं डॉ. ज्योती मेटे यांनी म्हटलंय. शिवसंग्राम प्रदेश कार्यकारणीसोबत चर्चा करून लोकसभा निवडणुकीविषयी कोणासोबत जायचं? याचा निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलं.
Lok Sabha Election
Dr. Jyoti MeteSaam TV

शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी लोकसभा निवडणूक लढणार अशी भूमिका त्यांनी मुंबईतून जाहीर केली होती. बीड लोकसभा मतदाससंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या. मात्र आता त्यांनी माघार घेतल्याचे स्वत: म्हटले आहे.

Lok Sabha Election
Hailstorm Hits Beed: बीड जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट; फळबागांसह शेतीचे माेठं नुकसान, 200 कोंबड्यांचा मृत्यू

आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन मी निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका डॉ. ज्योती मेटे यांनी जाहीर केली आहे. ३ एप्रिल रोजी डॉ. ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. या सर्वांवर पत्रकार परिषदेत डॉ. ज्योती मेटे यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार आणि आमच्यात कुठं काय खटकलं? हे मला सांगता येणार नाही, असं डॉ. ज्योती मेटे यांनी म्हटलंय. शिवसंग्राम प्रदेश कार्यकारणीसोबत चर्चा करून लोकसभा निवडणुकीविषयी कोणासोबत जायचं? याचा निर्णय घेणार. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांनी स्पष्ट केलं आहे.

मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केलाय, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक लढवावी असा जनतेचाच आग्रह होता. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

ज्योती मेटे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चा अन जरांगे पाटील यांचे बीडमधील सहकारी देखील उपस्थित होते. समाज म्हणून आम्ही ज्योती मेटे यांच्यासोबत आहोत, असं मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सांगितलं आहे.

Lok Sabha Election
Bengaluru Crime News: मुलीचा जीव घेणाऱ्याचा आईकडून सूड! बेंगळुरुतील काळीज सुन्न करणारं हत्याकांड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com