Hailstorm Hits Beed: बीड जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट; फळबागांसह शेतीचे माेठं नुकसान, 200 कोंबड्यांचा मृत्यू

प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून हाेऊ लागली आहे. या गारपिटीचा फटका पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्या तरुण शेतकऱ्याला देखील बसला आहे.
unseasonal rain and hailstorm in beed
unseasonal rain and hailstorm in beedsaam tv

Unseasonal Rain In Beed :

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीडच्या वडवणी, धारूर, गेवराई यासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसासह जोरदार गारांचा वर्षाव आजही (शुक्रवार) झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांसह पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

आज वडवणी तालुक्यातील कवडगाव, मोरेवाडी, देवडी, पिंपरखेड, साळींबा या गावात गारपीट झाली. यामुळे शेतातील आंब्याच्या बागांसह कलिंगड, बाजरी, कांदा यासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून हाेऊ लागली आहे. या गारपिटीचा फटका पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्या तरुण शेतकऱ्याला देखील बसला आहे.

unseasonal rain and hailstorm in beed
Buldhana Crime News : निवडणुकीच्या धामधूमीत तहसीलदाराने घेतली 35 हजार रुपयांची लाच, सिंदखेड राजा पाेलिसांत गुन्हा दाखल

वडवणी तालुक्यातील गणेश आंधळे या तरुण शेतकऱ्याने उदारनिर्वाहाचे साधन म्हणून पोल्ट्री फार्म सुरू केला होता. गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसाने जवळपास दीडशे ते 200 कोंबड्या मरण पावल्या. यामुळे गणेश आंधळे यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पालकमंत्री यांनी तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंधळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

unseasonal rain and hailstorm in beed
Hatkanangale Constituency: हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढतीची शक्यता, माेदींना पंतप्रधान पाहण्यासाठी अपक्ष आमदार निवडणुकीच्या रिंगणात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com