maharashtra lok sabha polls 2024 phase 2 voting date constituency all you need to know Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election Phase 2 : महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात प्रचाराचा ताेफा आज थंडावणार; अमित शाह, राहूल गांधींच्या सभा

दरम्यान आठही मतदासंघात प्रशासन देखील सज्ज झाले आहे. नांदेडमध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावून रांगाेळी काढून मतदानाचा संकल्प केला.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे / चेतन व्यास / संजय राठोड

Lok Sabha Election 2024 :

अमरावती लोकसभा मतदारसंघासह गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडल्या. येत्या 26 एप्रिलला दुस-या टप्प्यातील मतदान आहे. यामध्ये हिंगाेली, वर्धासह पश्चिम विदर्भातील यवतमाळ - वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. परिणामी आज (बुधवार) सायंकाळी सहा नंतर आठ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

वर्धा लाेकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध एनसीपी शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात लढत हाेणार आहे. तडस यांच्या प्रचारार्थ आज वर्धा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा हाेणार आहे. दुपारी 12 वाजता पुलगाव येथे तर 4 वाजता वर्धेत सभा हाेईल.

आज अमर काळे यांचा वर्धा शहरासह आजूबाजूच्या गावात प्रचार दौरा आहे. त्यांच्या समवेत माजी मंत्री व आमदार रणजित कांबळे हे देखील आहेत.

बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे निवडणुक लढवत आहेत तसेच अपक्ष रविकांत तुपकर सुद्धा झुंज देत आहेत.

या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जाधव यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची चिखली येथे दुपारी सभा हाेणार आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार सुरु राहणार असून त्यानंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सभांचा सपाटा सुरु आहे.

अमरावती मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे तसेच प्रहारचे दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात लढत असेल. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अमरावती येथील सायन्स कोअर मैदानात सभा हाेणार आहे. काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांची देखील अमरावती येथे सभा हाेणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यवतमाळ - वाशीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात लढत हाेत आहे तर बसपाकडून हरिभाऊ राठोड रिंगणात आहेत. अकोल्यात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि कॉंग्रेसचे अभय पाटील अशी लढत असणार आहे. या बराेबरच हिंगाेली, परभणी आणि नांदेड येथे आज प्रचाराचा अंतिम टप्पा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT