E-rickshaws In Matheran : माथेरानमध्ये ई रिक्षाची वाट सुकर, सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिकांना दिलासा

हातरिक्षा चालवणे अमानवीय असल्याने ई रिक्षाला परवानगी मिळावी यासाठी माथेरानकर आग्रही होते. 6 मार्च रोजी सनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय होऊन तसा अहवाल सर्वाेच्च न्यायालयात सादर करण्यात आला हाेता.
supreme court permits e rickshaws in matheran
supreme court permits e rickshaws in matheranSaam Digital
Published On

- सचिन कदम

Matheran News :

रायगड (raigad) जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान मध्ये पुन्हा ई रिक्षा धावणार (e rickshaw in matheran) आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने (supreme court) त्याबाबतचा आदेश नुकताच केला आहे. या आदेशान्वये आता माथेरानमध्ये 20 ई रिक्षा धावतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पर्यावरण दृष्ट्या संवेदनाशिल असल्याने माथेरान मध्ये पेट्रोल आणि डिझलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी होती. येथील स्थानिक हातरिक्षा आणि घोड्याचा वापर वरून पर्यटकांना सुविधा देत होते.

supreme court permits e rickshaws in matheran
Mahabaleshwar Travel Place : महाबळेश्वरला फिरायला जाताय? मॅप्रो गार्डनच नाही तर या पर्यटनस्थळांनाही द्या भेट

हातरिक्षा चालवणे अमानवीय असल्याने ई रिक्षाला परवानगी मिळावी यासाठी माथेरानकर आग्रही होते. 6 मार्च रोजी सनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय होऊन तसा अहवाल सर्वाेच्च न्यायालयात सादर करण्यात आला हाेता. (Breaking Marathi News)

20 ई रिक्षा चालवण्याला परवानगी

सर्वाेच्च न्यायालयाने नुकतीच ई रिक्षाला परवानगी दिली. त्यामुळे माथेरानमध्ये आता बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा धावू शकणार आहे. या निर्णयाचे स्थानिकांनी स्वागत केले. पर्यटकांनी देखील ई रिक्षामुळे स्थानिकांना मदत हाेईल असे नमूद केले. न्यायालयाने माथेरानमध्ये 20 ई रिक्षा चालवण्याला परवानगी दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

supreme court permits e rickshaws in matheran
Ratnagiri Sindhudurg Constituency: नारायण राणेंचा प्रचार करणार नाही? बैठकीत तक्रारींचा पाऊस; कुडाळात सेना-भाजपाची मनं जुळली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com