Manoj Jarange Patil Saam TV
लोकसभा २०२४

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाचा महायुतीला फटका?, मनोज जरांगेंचा कुणाला धोबीपछाड?

Lok Sabha Election Result 2024: मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. तर मराठा आरक्षणाचा महायुतीला फटका बसल्याची कबूलीच भाजपच्या गिरीश महाजनांनी दिली आहे.

Priya More

भरत मोहळकर, साम टीव्ही न्यूज

एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. त्यातच मराठा आरक्षणाचा (Maratha Arakshan) फटका कुणाला यावर भाजपच्या नेत्यांची वेगवेगळी मतं समोर येत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कुणाला धोबीपछाड दिलीय? त्यावरचा हा खास रिपोर्ट आहे.

लोकसभेच्या निकालापूर्वी एक्झिट पोल जाहीर झालेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीची मोठी पिछेहाट होतीय. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. तर मराठा आरक्षणाचा महायुतीला फटका बसल्याची कबूलीच भाजपच्या गिरीश महाजनांनी दिली आहे. तर विखे पाटलांना मात्र महाजनांची कबुली अमान्य आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याच राजकीय पक्षाला पाठींबा न देण्याचा निर्णय घेतला. मात्र आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं म्हणत मराठा समाजाला सूचक संदेश दिला. त्याचा फटका भाजप आणि महायुतीला बसल्याचं जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजात दिसून आलाय. मात्र आपली लढाई सगे सोयऱ्यांच्या कायद्यासाठी असून कोणी पडलं किंवा कोणी जिंकलं तरी त्यावर पोस्ट करू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय.

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात बसण्याची शक्यता विश्लेषकांकडून वर्तवली जातेय. मात्र महायुतीतच मराठा आरक्षणाचा फटका कुणाला यावर मतंमतांतरं आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंनी नेमकं कुणाला धोबीपछाड दिला हे 4 जूनच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर MIDC मध्ये 5 दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता

Driving License: घरबसल्या कसं बनवायचं लर्निंग लायसन्स? कोणते कागदपत्र लागतात, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Weight loss injection: लठ्ठपणावर मात करणं आता झालं स्वस्त, वजन घटवणारं औषध ₹900 पासून उपलब्ध

Salary Cuts: मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांच्या पगारात कपात, नेमकं कारण काय?

Banana Water Use For Long Hair : लांब केसांसाठी करा केळीच्या सालीचा वापर, केस झटपट वाढतील

SCROLL FOR NEXT