LokSabha Election Result: कोण-कोण होणार खासदार? सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी; जाणून घ्या कशी होते Voting Counting

LokSabha Election Voting Counting : लोकसभेच्या ५४३ जागांवर मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचं भवितव्य काय असणार याचे निकाल जाहीर होणार आहेत.
LokSabha Election Result: कोण-कोण होणार खासदार? सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी; जाणून घ्या कशी होते Voting Counting
LokSabha Election Voting Counting Business Standard

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर केले जाणार असून देशात पुढील ५ वर्ष कोणाचं सरकार सत्तेत येणार हे कळणार आहे. पारदर्शकता आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मतमोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलीय.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी रिटर्निंग ऑफिसर (RO) आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर (AROS) यांच्या देखरेखीखाली एका मोठ्या हॉलमध्ये होते. निवडणूक आयोगाच्या वतीने एक वरिष्ठ अधिकारी निरीक्षक म्हणून तैनात केला जातो. मतमोजणी सुरू करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारी मतांची गुप्तता राखण्याची शपथ घेतील शपथ घेतील.

कधी सुरू होईल मतमोजणी

मतमोजणी सकाळी ८वाजेपासून सुरू होतील. दरम्यान काही विशेष परिस्थितीत या वेळेत बदल केला जातो. मतमोजणी करताना सुरुवातीला बॅलेट पेपर आणि इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टमद्वारे टाकण्यात आलेल्या मतांची मोजणी केली जाते. दरम्यान बॅलेट पेपर आणि ईटीपीबीएसद्वारे निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेले सरकारी कर्मचारी, सैनिक, देशाबाहेर नोकरी करणारे अधिकारी, ज्येष्ठ मतदार आणि प्रतिबंधात्मक अटकेतील लोक देखील मतदान करतात. या मतांची मोजणी करण्यासाठी सुमारे अर्धा तासाचा वेळ लागत असतो.

सकाळी ८.३० वाजेनंतर सर्व टेबलवर एकाच वेळी ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होते. सभागृहात एका फेरीत १४ ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाते. तर १५ व्या टेबल हा रिटर्निंग अधिकारीचा असतो. मतमोजणी केंद्रावर उपस्थित रिटर्निंग अधिकारी मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर निकाल जाहीर करतात. याशिवाय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरही ते अपडेट केले जातं. सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीचा पहिला कल येण्यास सुरुवात होते.

मतमोजणी केंद्राच्या प्रत्येक हॉलमध्ये प्रत्येक टेबलवर उमेदवाराच्या वतीने एजंट उपस्थित राहत असतो. कोणत्याही एका सभागृहात १५ पेक्षा जास्त एजंट असू शकत नाहीत. प्रत्येक उमेदवार स्वत:चा एजंट निवडतो आणि त्याचे नाव, फोटो आणि आधार कार्ड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देत असतो.

LokSabha Election Result: कोण-कोण होणार खासदार? सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी; जाणून घ्या कशी होते Voting Counting
Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा काउंटडाऊन सुरू, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येईल रिझल्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com