Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा काउंटडाऊन सुरू, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येईल रिझल्ट

Maharashtra Lok Sabha Election Results Live: लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होण्यास आता फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत. यातच मतमोजणीची प्रत्येक अपडेट कुठे पाहता येणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर याचं उत्तर तुम्हाला या बातमीत मिळेल...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा काउंटडाऊन सुरू, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येईल रिझल्ट
Lok Sabha Election Result 2024Saam Tv

मंगळवारी म्हणजेच 4 जून हा देशाच्या राजकारणासाठी सर्वात मोठा दिवस आहे. उद्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. 7 टप्प्यात झालेल्या या निवडणुकीनंतर देशातील जनता आतुरतेने निकालाची वाट पाहत आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची नवी इंडिया आघाडी इंडिया आहे.

याआधी 1 जून रोजीच्या एक्झिट पोलने चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट केले असले तरी, खरा निकाल काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यातच मतमोजणीची प्रत्येक अपडेट्स कुठे आणि कसे पाहायला मिळणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट तपशीलवार सांगणार आहोत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा काउंटडाऊन सुरू, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येईल रिझल्ट
Nitish Kumar: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी नितीश कुमार यांनी घेतली PM मोदींची भेट, अमित शहा यांनाही भेटणार

निवडणूक निकाल कुठे आणि कसा पाहायचा?

निवडणूक आयोगाकडून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सुरुवातीचे ट्रेंड दिसू लागतील. निवडणूक निकाल पाहण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइट eci.gov.in ला भेट देऊ शकता. वेबसाइटवर जाऊन, तुम्हाला वर दिसत असलेल्या जनरल इलेक्शन 2024 वर क्लिक करावे लागेल. यासोबतच निवडणूक आयोगाशी संबंधित मतदार हेल्पलाइन ॲप आयओएस आणि अँड्रॉइड मोबाइल ॲपवर डाउनलोड करून सहज निकाल पाहता येणार आहे.

'साम टीव्ही' लाईव्ह पाहता येणार निकाल

याशिवाय तुम्ही 'साम टीव्ही'वरही निवडणुकीचे निकाल पाहू शकतात. उद्या साम टीव्हीवर दिवसभर मतमोजणीची प्रत्येक अपडेट लाईव्ह तुम्हाला पाहत येणार आहे. तसेच तुम्ही साम टीव्हीची वेबसाइट https://saamtv.esakal.com/ ला भेट देऊन प्रत्येक अपडेट पाहू शकता. साम टीव्ही तुम्हाला मतमोजणीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट्स देत राहील.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा काउंटडाऊन सुरू, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येईल रिझल्ट
Election Commission PC: लोकसभा निवडणुकीत देशात किती ठिकाणी फेरमतदान झालं?, निवडणूक आयोगाने दिली माहिती

किती वाजता मतमोजणी होणार सुरू होणार, निकाल कधी होणार स्पष्ट?

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आधी पोस्टल मतांची मोजणी केली जाईल आणि नंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल. पोस्टल मतपत्रिकेतही दोन गटात मतमोजणी होणार आहे. पहिली लष्कर, निमलष्करी दलाचे जवान आणि अधिकारी यांच्या मतांची मोजणी केली जाईल. यानंतर दुसऱ्या श्रेणीतील निवडणूक कर्तव्य बजावणारे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची पोस्टल मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांचे निकालही 4 जून रोजी येतील. दुपारी दोन वाजता निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ईव्हीएमचे VVPAT स्लिप मोजणी आणि पोस्टल मतपत्रिका जोडल्यानंतर, सर्व जागांचे निकाल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घोषित की जाऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com