Nitish Kumar: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी नितीश कुमार यांनी घेतली PM मोदींची भेट, अमित शहा यांनाही भेटणार

Nitish Kumar Meets PM Modi: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणूक निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी नितीश कुमार यांनी घेतली PM मोदींची भेट, अमित शहा यांनाही भेटणार
Nitish Kumar Meets Pm ModiSaam Tv

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीआधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश कुमार सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जेडीयूचे राज्यसभा खासदार संजय झाही होते.

यातच आजच नितीश कुमार दुपारी चार वाजता गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहेत. नितीश कुमार एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही भेटू शकतात. बिहार विधानसभेच्या निवडणुकाही याच वर्षी होणार आहेत. नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याचा संबंध विधानसभा निवडणुकीशीही संबंधित असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी नितीश कुमार यांनी घेतली PM मोदींची भेट, अमित शहा यांनाही भेटणार
Election Commission PC: लोकसभा निवडणुकीत देशात किती ठिकाणी फेरमतदान झालं?, निवडणूक आयोगाने दिली माहिती

पंतप्रधानांनंतर नितीश कुमार 4 जून रोजी गृहमंत्र्यांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालांवर चर्चा करू शकतात. याशिवाय बिहारच्या अनेक विकास प्रकल्पांवरही चर्चा होऊ शकते.

दरम्यान, या भेटीनंतर नितीश कुमार आता बिहारच्या राजकारणातून दिल्लीकडे जाण्याचा विचार करत असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण यावेळी एक्झिट पोलमध्ये जेडीयूची कामगिरी काहीशी निराशाजनक दिसत आहे. अशातच नितीश कुमार आता दिल्लीत राजकारण करण्याचा विचार करत आहेत की काय, अशीही चर्चा आहे. मात्र याबाबत जेडीयू किंवा नितीश कुमार यांच्याकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी नितीश कुमार यांनी घेतली PM मोदींची भेट, अमित शहा यांनाही भेटणार
Election Commission PC: लोकसभा निवडणुकीत देशात किती ठिकाणी फेरमतदान झालं?, निवडणूक आयोगाने दिली माहिती

नितीश कुमार यांच्या भेटीदरम्यान जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, ''ते एनडीएच्या संस्थापक सदस्यांमध्ये आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अटल, अडवाणी आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी मिळून एनडीएची स्थापना केली, त्यावेळी जेडीयूही होती. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com