Election Commission PC: लोकसभा निवडणुकीत देशात किती ठिकाणी फेरमतदान झालं?, निवडणूक आयोगाने दिली माहिती

Loksabha Election 2024 Result: देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी लोकसभा निवडणूक निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणुकीबाबतची सर्व माहिती माध्यमांसमोर सांगितली. यावेळी त्यांनी देशामध्ये किती ठिकाणी फेरमतदान झालं याबद्दल सांगितले.
Election Commission PC: देशात किती ठिकाणी फेरमतदान झालं?, निवडणूक आयोगाने दिली माहिती
Election Commission PCSaam Tv
Published On

लोकसभा निवडणूक २०२४ चा (Loksabha Election 2024) निकाल ४ जूनला म्हणजे उद्या जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी देशामध्ये यावेळी किती ठिकाणी फेरमतदान झालं याबाबत सांगितले. २०२४ मध्ये फक्त ३९ ठिकाणी फेरमतदान झालं असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सावधानपूर्वक कामामुळे आम्ही कमी फेरमतदान सुनिश्चित केले आहे. आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३९ फेरमतदान झाले. २०१९ मध्ये ५४० फेरमतदान झाले होते. या ३९ पैकी २५ फेरमतदान फक्त २ राज्यांमधील आहेत. अरुणाचल आणि मणिपूरमध्ये ही दोन राज्य आहेत. यासोबत मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील फेरमतदान झालं पण प्रमाण कमी होते.'

Election Commission PC: देशात किती ठिकाणी फेरमतदान झालं?, निवडणूक आयोगाने दिली माहिती
Lok Sabha 2024: यंदा ६४ कोटी नागरिकांनी मतदान केलं; मतमोजणीची तयारी पूर्ण, निकालापूर्वी निवडणूक आयोगाने नेमकं काय सांगितलं?

राजीव कुमार यांनी पुढे सांगितले की, 'ही निवडणूक त्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी एक आहे ज्यामध्ये आम्ही हिंसाचार पाहिला नाही. यासाठी दोन वर्षांची तयारी करावी लागली. आता मतमोजणीसाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे.' यावेळी त्यांनी असे देखील सांगितले की, 'यावर्षी ६४ कोटी नागरिकांनी मतदान केले. यावर्षी ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला.'

Election Commission PC: देशात किती ठिकाणी फेरमतदान झालं?, निवडणूक आयोगाने दिली माहिती
Kalyan Lok Sabha Constituency: जनता कोणाला देणार साथ? श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेत जाणार की, दरेकरांना मिळणार दिल्लीचं तिकीट?

तसंच, राजीव कुमार यांनी असे देखिल सांगितले की, 'निवडणूक आयोगाने या निवडणुकीत सुमारे १०,००० कोटी रुपये जप्त करण्याचा विक्रम केला आहे. हे २०१९ मध्ये जप्त केलेल्या मूल्याच्या जवळपास ३ पट आहे. स्थानिक टीमला त्यांचे काम करण्याचे अधिकार देण्यात आले होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण ५८.५८ टक्के मतदान झाले.'

Election Commission PC: देशात किती ठिकाणी फेरमतदान झालं?, निवडणूक आयोगाने दिली माहिती
Surat lok Sabha :...तर आम्ही कारवाई केली असती; सूरतच्या जागेवरील बिनविरोध निवडणुकीवर मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com