लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result 2024) ४ जून रोजी जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) मुंबईतील वाहतुकीच्या मार्गात काही बदल केले आहेत. मतदान मोजणी केंद्र परिसरात होणारी गर्दी पाहता वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. ४ जून रोजी सकाळी ५ ते सायंकाळी ५ पर्यंत सर्व वाहनांना तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालण्यात आली आहे.
४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये तीन मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. मतदार संघाचे उमेदवार त्यांचे कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांची वाहने यांची गर्दी लक्षात घेता वाहतूक विभागाने बदल केला आहे. एक प्रसिद्धी पत्र काढून वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी NESCO हॉल नंबर ४ आणि ५ याठिकाणी असल्याने उद्या पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जयकोच जंक्शन कडून NESCO च्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड ते NESCO गेट क्रमांक 2A पर्यंत, साऊथ बॉण्ड व नॉर्थ बॉण्ड असे दोन्ही बॉण्ड सर्व प्रकारच्या गाड्यांना रहदारीस बंद ठेवण्यात आला आहे. फक्त निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहनं वगळता इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, साऊथ व नॉर्थ बॉण्ड पूर्णपणे सुरू राहील.
लक्ष्मणनगर , घास बाजार रोड, बीएमसी मैदान
लक्ष्मण नगर, घास बाजार रोड, जांगिड डेव्हलपर्स आवार
नेस्को गेट नं 2A
लोढा पीपीएल बीएमसी पार्किंग
पशुवैद्यकीय महाविद्यालय, महानंदा डेअरी बाजुला
पोलिंग एजंट यांची पार्किंग गेट क्रमांक 2A नेस्को
यादरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र नेस्को ते हबमोल पर्यंतचा सर्विस रोड हा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे, असे देखील वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्या या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांनी या गोष्टींची नोंद घ्यावी आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.