Mumbai Crime News: मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; इमारतीवरुन घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट

vikas rastogi daughter ends life : मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सुनीती नावाच्या इमारतीवरुन उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली आहे.
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; इमारतीवरुन घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट
Mumbai Crime News: Saam tv

मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीवरुन उडी घेत जीवन संपवलं आहे. मंत्रालयासमोरील इमारतीवरुन या तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सुनीती नावाच्या इमारतीवरुन उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली आहे. मंत्रालय परिसरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.लिपी रस्तोगी असे तरुणीचे नाव आहे. लिपी ही कायद्याचे शिक्षण घेत होती. लिपी रस्तोगीच्या आत्महत्येचं पाऊल उचलण्यामागचं कारणही समोर आलं आहे.

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; इमारतीवरुन घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट
Rajasthan Crime News: राजस्थान हादरलं! आईने केली पोटच्या ४ मुलांची हत्या; स्वत:लाही संपवण्याचा केला प्रयत्न

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र कॅडरचे आएएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या घरात आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी देखील सापडली आहे. रस्तोगी यांच्या मुलीचं वय २७ वर्ष आहे. विकास रस्तोगी सध्या शिक्षण विभागाचे सचिव आहेत.

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; इमारतीवरुन घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट
Jalgaon Crime News : जळगावात भर रस्त्यात तरुणाची हत्या, घटनेनं परिसरात गंभीर वातावरण

आज सोमवारी सकाळी चार वाजता १० मजली इमारतीवरून उडी घेतली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. उडी घेतल्यानंतर तरुणीला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर जीटी रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. लिपीच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लिपीच्या पार्थिवावर १ वाजता चंदनवाडी स्मशानभूमीवर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.

आत्महत्येपूर्वी लिपी रस्तोगीने चिठ्ठीत काय म्हटलं?

लिपी रस्तोगी हरियाणाच्या सोनिपत येथे एलएलबीचं शिक्षण घेत होती. शैक्षणिक कामगिरीवर चिंतित असल्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुसाईड नोटमध्ये तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचा उल्लेख आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com