Jalgaon Crime News : जळगावात भर रस्त्यात तरुणाची हत्या, घटनेनं परिसरात गंभीर वातावरण

Jalgaon Crime News Today | जळगावात एक धक्कादायक घटना घडलीये. भर रस्त्यात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका अद्यापही थांबलेली नाही. शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह पथकाने धाव घेतली. मृत तरुणाचा खून का केला? कुणी केला? याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली आहेत. परंतु मृत तरुणाची बॅग रस्त्याच्या कडेला मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com