Central railway : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; पश्चिमनंतर मध्य रेल्वेची सेवाही विस्कळीत

central railway train late : पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेचीही सेवा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; पश्चिमनंतर मध्य रेल्वेची सेवाही विस्कळीत
Central Railway Mega BlockSaam Digital
Published On

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वेचं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वेळापत्रक कोलमडलं. पश्चिम रेल्वे पाठोपाठ सोमवारी मध्य रेल्वेचीही सेवा विस्कळीत झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे रेल्वे विस्कळी झाल्याने आठवड्याच्या पहिली दिवशी कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुले मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला आहे. या बिघाडामुळे गाड्या वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. शनिवार-रविवारी 36 तासांचा विशेष ब्लॉक घेऊन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग करण्यात काम करण्यात आलं होतं. मात्र स्टेबिलिटी इश्यूमुळे रेल्वेच वेळापत्रक कोलमडलं आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; पश्चिमनंतर मध्य रेल्वेची सेवाही विस्कळीत
Mumbai Crime News: मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; इमारतीवरुन घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट

आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईची दोन्ही मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. दोन्ही सेवा विस्कळीत झाल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कर्मचारी उशिरा ऑफिसमध्ये पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com