Mumbai Crime News: बायकोने वाढदिवसाचा केक उशिरा आणला; संतापलेल्या नवऱ्याने केलं भयंकर कृत्य

Husband Attack On Wife And Son: वाढदिवसाला केक उशिरा आणल्यामुळे नवऱ्याने बायको आणि मुलावर चाकूहल्ला केलाय. ही घटना रविवारी मध्यरात्री साकीनाका परिसरात घडली आहे.
बायको आणि मुलावर चाकूहल्ला
Husband Attack On Wife And SonYandex

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबईमध्ये एका नवऱ्याने बायको आणि मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाढदिवसाचा केक उशिरा आणल्यामुळे नवरा संतापला. रागाच्या भरात त्याने बायको आणि मुलावर चाकूहल्ला केला. या घटनेमध्ये महिला आणि मुलगा जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, राजेंद्र शिंदे याचा शनिवारी (१ जून) वाढदिवस होता. परंतु राजेंद्रची पत्नी कामावर गेलेली होती. त्यामुळे ती शनिवारी सायंकाळी उशिरा घरी आली. त्यामुळे राजेंद्रच्या वाढदिवसाचा केक (Birthday Cake) आणायला उशीर झाला होता. केक उशिरा आल्यामुळे राजेंद्रच्या रागाचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात बायको आणि मुलावर चाकूने वार केले.

या हल्ल्यामध्ये त्याने पत्नीच्या मनगटावर तर मुलाच्या पोटात आणि छातीत चाकूने वार (Crime News) केले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी आई आणि मुलगा या दोघांनाही राजावाडी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पती राजेंद्र शिंदे याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला (Husband Attack On Wife And Son) आहे. हल्ल्यानंतर आरोपी पती फरार असल्याचं समोर आलं आहे. साकीनाका पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

बायको आणि मुलावर चाकूहल्ला
Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! शिक्षकानं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीने संपवलं जीवन

मुंबईमध्ये आंघोळीला पाणी दिलं नाही म्हणून नवऱ्याने बायकोवर हल्ला केल्याची घटना काल घडली आहे. मुंबईमध्ये सध्या पाणीकपात सुरू आहे. याच पाणीकपातीमुळे पती पत्नीचा वाद झाला. रागाच्या भरात नवऱ्याने बायकोवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना देखील साकीनाका परिसरातील आहे. त्यानंतर आता वाढदिवसाच्या केकवरून नवऱ्याने बायको आणि मुलावर हल्ला केला (Mumbai Crime News) आहे.

बायको आणि मुलावर चाकूहल्ला
Nashik Crime News: दुचाकीवरून आले अन् पैशांची बॅग घेऊन पळाले; भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला लुटलं, सिनेस्टाईल थरार CCTV मध्ये कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com