Nashik Crime News: दुचाकीवरून आले अन् पैशांची बॅग घेऊन पळाले; भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला लुटलं, सिनेस्टाईल थरार CCTV मध्ये कैद

Onion Trader Robbed In Vinchur CCTV Video: नाशिकमध्ये भरदिवसा एका कांदा व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
कांदा व्यापाऱ्याला लुटलं
Nashik Crime NewsSaam Tv

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमधून एक चोरीची घटना समोर आली आहे. विंचूरमध्ये काल चोरीचा सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला आहे. भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. चोर दुचाकीवरून आले अन् पैशांची बॅग घेऊन पळाले, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

विंचूरमध्ये भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला (Nashik Crime News) लुटलं. सहा लाख रुपये घेवून चोरट्यांनी पोबारा केला आहे. विंचूरच्या श्रीराम चौकात पोलीस चौकीसमोरची ही घटना १ जून रोजी दुपारी घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, कांदा खरेदीचे शेतकऱ्यांचे पेमेंट अदा करण्यासाठी कांदा व्यापाऱ्याने बॅंकेमधून रोकड काढली होती. ही रक्कम सहा लाख रूपये असल्याची माहिती मिळतेय.

बँकेतून काढलेली ६ लाख रुपयांची रोकड हिसकावून चोरटे फरार झाले आहेत. चोरीची संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आली आहे. भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला लुटल्याने कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण (Onion Trader Robbed In Vinchur CCTV Video) आहे. आता या अज्ञात चोरट्यांविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

कांदा व्यापाऱ्याला लुटलं
Noida Car Accident CCTV: पुण्यासारखीच घटना नोएडात घडली, सुसाट आलीशान कारची धडक, आजोबा हवेत उडाले, VIDEO बघून संताप होईल!

चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली (Nashik News) आहे. दुतर्फा गर्दी असलेल्या रस्त्यावर एक कांदा व्यापारी त्याच्या दुचाकीवरून जाताना दिसत आहे. त्याच्याकडे पैशाची बॅग होती. तेवढ्यात पाठीमागुन दुचाकीवरून काही लोक आले अन् पैशाची बॅग घेऊन पळाले. रस्त्यावरील इतर लोकांसमोर ही घटना घडली आहे. भरदिवसा चोरांनी कांदा व्यापाऱ्याला लुटलं आहे. यानंतर कांदा व्यापाऱ्याने चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण ते पसार (Crime News) झाले.

कांदा व्यापाऱ्याला लुटलं
Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव कारने तरुणाला चिरडले, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com