राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. ठिकठिकाणी सभा, रॅली आणि बैठकांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे आणि सभा सुरू आहेत. अशामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या देखील राज्यभर सभा होणार आहे. शरद पवाराचा राज्यात मॅरेथॉन दौरा होणार आहे. २२ दिवसांमध्ये त्यांच्या राज्यभर ५० सभा होणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. शरद पवार प्रचारासाठी राज्याचा मॅरेथॉन दौरा करणार आहेत. शरद पवारांच्या राज्यात २२ दिवसांत ५० सभा घेणार आहे. १८ एप्रिलपासून बारामतीतून शरद पवारांच्या सभेला सुरुवात होणार आहे. ११ मेपर्यंत ते राज्यभरात मॅरेथॉन दौरा करणार आहेत. शरद पवार दिवसाला ३ ते ४ सभा घेणार आहेत. रावेर, शिरूर, बीड, पुणे अहमदनगर, बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर,औरंगाबाद येथे शरद पवारांच्या या सभा होणार आहेत.
१८ एप्रिल - बारामती शिरुर मावळ आणि पुणे लोकसभा मतदार संघ नामांकन अर्ज दाखल करणार आणि जाहीर सभा.
२० एप्रिल - दिंडोरी लोकसभा अंतर्गत मनमाड येथे जाहीर सभा. तसंच, रावेर लोकसभा अंतर्गत चोपडा येथे जाहीर सभा.
२१ एप्रिल - रावेर लोकसभा अंतर्गत रावेर येथे जाहीर सभा. तसंच, वर्धा लोकसभा अतंर्गत मोर्शी येथे जाहीर सभा.
२२ एप्रिल - वर्धा लोकसभा अंतर्गत हिंगणघाट येथे जाहीर सभा.
२३ एप्रिल - रायगड लोकसभा अंतर्गत अलिबाग येथे जाहीर सभा.
२४ एप्रिल - माढा लोकसभा अंतर्गत कुडूवाडी येथे जाहीर सभा, सातारा लोकसभा अंतर्गत वाई येथे जाहीर सभा आणि बारामती लोकसभा अंतर्गत भोर येथे जाहीर सभा.
२५ एप्रिल - अहमदनगर लोकसभा अंतर्गत शेवगाव येथे जाहीर सभा,
बीड लोकसभा अंतर्गत माजलगाव येथे जाहीर सभा आणि बारमती लोकसभा अतंर्गत दौंड येथे जाहीर सभा.
२६ एप्रिल - माढा लोकसभा अंतर्गत करमाळा/टेंभूर्णी येथे जाहीर सभा, माढा लोकसभा अंतर्गत सांगोला येथे जाहीर सभा आणि त्याच दिवशी माढा लोकसभा अंतर्गत पंढरपूर येथे जाहीर सभा होणार.
२७ एप्रिल - माढा लोकसभा अंतर्गत दहिवडी येथे जाहीर सभा.
२८ एप्रिल - शिरूर लोकसभा अंतर्गत उरळी कांचन येथे जाहीर सभा,
अहमदनगर लोकसभा अंतर्गत श्रीगोंदा येथे जाहीर सभा आणि बारामती लोकसभा अंतर्गत सासवड येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार.
२९ एप्रिल - सातारा लोकसभा अंतर्गत कोरेगाव येथे जाहीर सभा आणि
बारामती लोकसभा अंतर्गत वारजे येथे जाहीर सभा.
३० एप्रिल - माढा लोकसभा अंतर्गत फलटण येथे जाहीर सभा आणि सातारा लोकसभा अंतर्गत पाटण येथे जाहीर सभा होणार.
१ मे - रावेर लोकसभा अंतर्गत जामनेर येथे जाहीर सभा आणि रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर येथे जाहीर सभा आणि औरंगाबाद लोकसभा अंतर्गत औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार.
२ मे - अहमदनगर लोकसभा अंतर्गत राहुरी येथे जाहीर सभा आणि त्याचदिवशी बारामती लोकसभा अंतर्गत नीरा येथे जाहीर सभा होणार.
३ मे - सातारा लोकसभा अंतर्गत कराड येथे जाहीर सभा आणि कोल्हापूर लोकसभा अंतर्गत कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार.
४ मे - सातारा लोकसभा अंतर्गत सातारा येथे जाहीर सभा होणार.
५ मे - बारामती लोकसभा अंतर्गत इंदापूर येथे जाहीर सभा आणि
बारामती लोकसभा अंतर्गत बारामती येथे जाहीर सभा होणार.
६ मे - शिरूर लोकसभा अंतर्गत शिवगोरक्ष मैदान येथे जाहीर सभा होणार.
८ मे - रावेर लोकसभा अंतर्गत रांजणगाव येथे जाहीर सभा होणार.
९ मे - अहमदनगर लोकसभा अंतर्गत पारनेर येथे जाहीर सभा आणि त्याच दिवशी बीड लोकसभा अंतर्गत बीड येथे जाहीर सभा होणार.
१० मे - शिरूर लोकसभा अंतर्गत चाकण येथे जाहीर सभा आणि पुणे येथे ४ चौक सभा होणार.
११ मे - बीड लोकसभा अंतर्गत अंबेजोगाई येथे जाहीर सभा आणि याचदिवशी अहमदनगर लोकसभा अंतर्गत अहमदनगर येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.