Pune Fire: पुण्यात १५० वर्षे जुना देवरुखकर वाड्याला भीषण आग, ट्रॉफी बनवण्याचा कारखाना जळून खाक

Devrukhkar Wada Gutted By Fire: अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या वाड्यामध्ये ट्रॉफी बनवण्याचा कारखाना होता. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Fire
Pune Fire Saam Tv

पुण्यामध्ये देवरुखकर वाड्याला (Devrukhkar Wada) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या वाड्यामध्ये ट्रॉफी बनवण्याचा कारखाना होता. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये असलेल्या देवरुखकर वाड्याला भीषण आग लागली. दुपारी पवाणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. भाऊ रंगारी गणपतीजवळ हा दुमजली वाडा आहे. या वाड्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतकी भीषण होती ही यामध्ये वाड्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. वाड्यामध्ये लाकडी साहित्य असल्यामुळे आग वाढतच चालली होती.

Pune Fire
UPSC 2023 Final Result: यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; लखनऊचा आदित्य ठरला टॉपर

या दुमजली देवरुखकर वाड्यामध्ये कोणी राहत नव्हते. जुन्या वाड्यात सध्या ट्रॉफी बनवण्याचे मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवले आहे. या साहित्याने पेट घेतला असून मोठ्या प्रमाणात धुर झाला होता. अग्निशमन दलाच्या जवळपास १० अधिकारी आणि ४० जवानांनी आग इतरत्र पसरु न देता धोका टाळला. या आगामध्ये कोणी जखमी झाले नाही तसंच जीवितहानी झाली नाही.

Pune Fire
Home Ministry Fire: मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्रालयात भीषण आग; कॉम्प्युटर, कागदपत्रे जळून खाक

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली आहे. सध्या कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्थानिक नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. देवरुखकर यांचे लाखोंचे नुकसान झालं आहे. या कारखान्यात ट्रॉफ्या बनवल्या जात होत्या. या आगीमध्ये कारखान्यातील ट्रॉफी बनवण्याचे साहित्य जळून खाक झाले आहे. या वाड्याच्या बाजूलाही जुने वाडे आहेत. आग आटोक्यात आल्यामुळे मोठी हानी टळली.

Pune Fire
MLA Kailash Patil : धाराशिवचे आमदार कैलास पाटील चक्कर येऊन पडले; ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारावेळी उष्माघाताचा त्रास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com