Lok Sabha Election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Sangli Lok Sabha : निवडणूक काळात सांगलीच्या सभांमध्ये एक व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून लोकांचं लक्ष्य वेधून घेत आहे. नरेंद्र मोदी यांचा हुबेहुब आवाज आणि त्यांच्या सारखीच अॅक्शन सुद्धा या व्यक्तीकडून केली जाते.

Sandeep Gawade

निवडणूक काळात सांगलीच्या सभांमध्ये एक व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून लोकांचं लक्ष्य वेधून घेत आहे. नरेंद्र मोदी यांचा हुबेहुब आवाज आणि त्यांच्या सारखीच अॅक्शन सुद्धा या व्यक्तीकडून केली जाते. गेल्या १० वर्षांपासून नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वासुंबे येथील संभाजी थिटे ही व्यक्ती अनेक सभांना हजेरी लावत आहे.

सांगली जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या अनेक सभांना संभाजी थिटे हजेरी लावत आहेत. गेल्या दहा वर्षापासून निवडणूक काळामध्ये संभाजी थेटे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून प्रचार सभांमध्ये सहभागी होतायेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा लावण्याबरोबरच ते मोदीच्या स्टाईल मध्ये डायलॉग देखील मारतात. मोदींचा हुबेहूब आवाज काढतात. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचा चाहता असल्याचे देखील ते सांगतात.

सांगली राज्यात महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे. गेल्या काही दिवसात सांगलीत मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्यासह देशाचंही लक्ष लागलं आहे. प्रचारही शिगेला पोहोचला आहे. महायुतीने सभांचा धडाका लावला आहे. त्यामुळे सांगलीचं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात मोदींचा मुखवटा घालून सभांना हजेरी लावणारे संभाजी थिटे सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा! पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी

दिवाळीत दिव्यामध्ये केसर टाकल्यास काय होतं?

Nagpur Crime : मुलगा-सून मुंबईला गेले, घरात आईची निर्घुण हत्या; नागपूरात भयकंर घडलं

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT