PM Modi, Amit Shah, J. P. Nadda
PM Modi, Amit Shah, J. P. Nadda SAAM TV
लोकसभा २०२४

BJP Manifesto: गरीबांसाठी ३ कोटी घरे बांधणार, महिलांना लखपती बनवणार; मोदींनी मतदारांना कोणती गॅरंटी दिली?

Satish Daud-Patil

Lok Sabha Election 2024 BJP Manifesto

मोदी की गॅरंटी आणि भाजपचा संकल्प या नावाने भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते भाजपने हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमकरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष भर देण्यात आलाय.

याशिवाय भाजपच्या जाहीरनाम्यात उद्योजकतेवरही लक्ष देण्यात आलं आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या.

दरम्यान, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं. पुढील ५ वर्षांपर्यंत गरीबांना मोफत रेशन मिळेल. तसेच ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतील. जन औषधी योजनेचा विस्तार केला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

भाजपच्या जाहीरनाम्यात कोणकोणत्या मोठ्या घोषणा?

  • गरीबांना पुढील ५ वर्षे मोफत धान्य मिळणार आहे.

  • देशातील ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे.

  • देशातील गरीबांसाठी ३ कोटी घरे बांधण्यात येणार आहे.

  • ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • यापुढे तृतीयपंथी समुदायाला देखील आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • देशातील कानाकोपऱ्यातील घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे.

  • ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ या पुढेही १० कोटी शेतकऱ्यांना मिळणार

  • कोट्यवधी लोकांची वीजबिल शून्य करणार, अशी घोषणा देखील जाहीरनाम्यात करण्यात आली.

  • त्याचबरोबर देशात 5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु करण्यात येईल.

  • याशिवाय अनेक मोठमोठ्या घोषणा भाजपने आपल्या जाहीरनाम्यात केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT