Nanded Politics: अशोक चव्हाण यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली; वसंतराव चव्हाण यांचा गौप्यस्फोट

Vasant Chavan on Ashok Chavan: भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी मला फोन केला आणि भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, असा गौप्यस्फोट नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी केला आहे.
Vasant Chavan on Ashok Chavan
Vasant Chavan on Ashok ChavanSaam TV

Vasant Chavan Latest News

भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी मला फोन केला आणि भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, असा गौप्यस्फोट नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी वसंतराव चव्हाण यांनी शनिवारी (ता. १३) नांदेडच्या मरकळ येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

Vasant Chavan on Ashok Chavan
Lok Sabha 2024: भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, साकोलीत आज अमित शहांची तोफ धडाडणार; राहुल गांधींना काय उत्तर देणार?

वसंतराव चव्हाण यांच्या गौप्यस्फोटानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) आता काँग्रेस नेते तसेच पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचून नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करताहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मी स्वीच केलंय, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नव्या भूमिकेत चव्हाणांनी चोख कामगिरी बजावण्यास सुरुवात केली आहे. (Breaking Marathi News)

वसंतराव चव्हाण काय म्हणाले?

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांचा मला दिल्लीहून फोन आला होता. तुम्ही माझं अभिनंदन केलं नाही, असं त्यांनी मला म्हटलं. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, की तुमचे काय म्हणून अभिनंदन करू. आपण नांदेडला आल्यावर सविस्तर बोलू असंही मी त्यांना सांगितलं, असं वसंतराव चव्हाण म्हणाले.

यावेळी अशोक चव्हाण यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील दिली. परंतु मी त्यांना म्हणालो, की तुम्ही साधलं ठीक आहे पण आम्हाला ते जमणार नाही. या जिल्ह्याची काँग्रेस कमिटी आम्ही सर्वजण मिळून हातात घेऊ. तसेच एकत्रिपणे काम करू. उद्या जनता दरबार तुमचा फैसला करेल, असं वसंतराव चव्हाण म्हणाले.

Vasant Chavan on Ashok Chavan
Lok Sabha 2024: आमचं सरकार गरिबांसाठी समर्पित; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपच्या जाहीरनाम्याचं लोकार्पण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com