Lok Sabha 2024: भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, साकोलीत आज अमित शहांची तोफ धडाडणार; राहुल गांधींना काय उत्तर देणार?

Amit Shah Sakoli Sabha: अमित शहा देखील आज रविवारी विदर्भातील साकोली येथे जंगी सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.
Amit Shah On Rahul Gandhi
Amit Shah On Rahul Gandhi Saam Tv

Amit Shah BJP Sakoli Sabha Today

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते जंगी सभा घेत आहेत. अगदी दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात जंगी सभा घेतली होती. आता अमित शहा देखील आज रविवारी विदर्भात सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

Amit Shah On Rahul Gandhi
Explainer: उद्धव ठाकरे गट आणि भाजपचा ग्राऊंडवर थेट सामना कमी? नेमकं कारण काय?

देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज विदर्भ दौऱ्यावर असून ते भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ साकोली येथे प्रचारसभा घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे शनिवारी (ता. १३) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी साकोली येथे जाहीर सभा घेतली होती.

या सभेतून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने फक्त धनाढ्यांसाठीच काम केलं असून हे जनतेचे नव्हे, तर अदानींचे सरकार आहेत. अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली होती. राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर देखील हात घातला होता.

देशात तब्बल ३० लाख सरकारी पदे रिक्त असून, मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत ही पदे भरली नाही. आज देशात बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्या आहे. पंतप्रधान मोदी सर्व विषयांवर बोलतात पण बेरोजगारीवर बोलत नाहीत. आमची सत्ता येताच ३० लाख जागा भरण्यात येतील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

त्याचबरोबर आम्ही सत्तेत आल्यानंतर लष्कर भरतीची अग्निवीर योजना रद्द करू आणि शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देऊ, असे आश्वासन राहुल गांधी यांनी मतदारांना केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांच्या सभेनंतर आज अमित शहा साकोली येथे सभा घेणार आहेत.

त्यामुळे या सभेतून ते नेमकं काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नागपुरात असणार आहेत. दुपारी दीड वाजता ते दीक्षाभूमी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी मध्य नागपुरातील गोळीबार चौकात जाहीर सभा घेणार आहेत.

Amit Shah On Rahul Gandhi
Loksabha Election: राजकारणात आलं शेण आणि मटन; खाण्या-पिण्यावरुन तापलं निवडणुकीचं वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com