Explainer: उद्धव ठाकरे गट आणि भाजपचा ग्राऊंडवर थेट सामना कमी? नेमकं कारण काय?

Lok Sabha Election 2024: राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांतून आत्तापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी ठाकरे गट आणि भाजपची केवळ 3 जागांवरच थेट लढत होणार आहे. तर सर्वाधिक भाजप विरुद्ध काँग्रेसचे 14 जगांवर आमनासामना होणार आहे.
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis SAAM TV

BJP Vs Thackeray Group:

>> प्रसाद जगताप

राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांतून आत्तापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी ठाकरे गट आणि भाजपची केवळ 3 जागांवरच थेट लढत होणार आहे. तर सर्वाधिक भाजप विरुद्ध काँग्रेसचे 14 जगांवर आमनासामना होणार आहे. वास्तविक तसं पहायला गेलं तर, महाविकास आघाडीत जागावाटपात उद्धव ठाकरे गट मोठा भाऊ ठरलाय. तर महायुतीत भाजपच निर्वीवाद मोठा भाऊ आहे.

आता मोठ्या भावाचा मोठ्या भावाशी सामना होणं अपेक्षीत होतं. म्हणजे भाजपच्या उमेदवारांविरोधात ठाकरेंचे उमेदवार लढतील, अशी लढत अपेक्षीत असताना, भाजप विरुद्ध काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना अशीच काहीशी लढत दिसतेय. पण, असं का? भाजप आणि ठाकरेंची मैदानावर आमनेसामे लढाई का नाहीये? यामागचं कारण काय? हेच जाणून घेऊ...

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Maharashtra Politics: पवारांचा डाव, भाजपला घाव! 3 बडे नेते 'शिवरत्न'वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?

पहिल्यांदा राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झालंय. जागावाटप जरी पूर्ण झालं असलं तरी अद्याप महाविकास आघाडीकडूनही काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीयेत. महायुतीचं तर 10 जगांवरून घोडं अडलंय. त्यांचेही अनेक जागांवर उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत कुणाचा कसा सामना होणार आहे, हे जाणून घेऊ...

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटाची थेट सहा जागांवर लढत होणार आहे. या 8 जागा कोणत्या तर, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, कल्याण, मावळ, हातकणंकले, दक्षीण मध्य मुंबई आणि शिर्डी. आता ठाकरे गट विरुद्ध भाजप किती आणि कोणत्या जागांवर आमनेसमाने आलेत ते जाणून घेऊ...

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Sindhudurg Lok Sabha: ...म्हणून आम्हाला ती जागा हवी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर उदय सामंत यांनी पुन्हा केला दावा

जळगाव, मुंबई इशान्य आणि सांगली केवळ या तिनच जागांवर अद्यापतरी ठाकरे विरुद्ध भाजप आमसनेसामने येणार असल्याचं चित्र आहे. यातून तुमच्या लक्षात येईल की भाजप विरुद्ध ठाकरे गटाची आत्तापर्यंत केवळ 3 जागांवर थेट फिक्स आहे.. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून चौथी लढत होण्याची चिन्ह आहेत.

शिवसेनेत उभी पडली. फूट पडल्यावर ठाकरे आणि शिंदे गटाने आपल्या पारंपारीक मतदासंघांवर दावा केला. महायुतीतून त्या जागा शिंदे गट शिवसेनेला मिळाल्या आणि महाविकास आघाडीतून त्याच जागा ठाकरे गटाला मिळाल्यात. म्हणून शिंदे आणि ठाकरेंची थेट लढत जास्तीत जास्त पहायला मिळातेय. कारण या मतदासंघात शिवसेनेची ताकद आहे. पण, ती कोणत्या शिवसेनेची ताकद आहे? हे मात्र या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर कळू शकेल.

उद्धव ठाकरे गट आणि भाजप हे एकेकाळचे मित्रपक्ष आहेत. त्यामूळे ज्या मतदारसंघात भाजपची ताकद होती. तिथ शिवसेनेने उमेदवार दिले नाहीत आणि जिथं शिवसेनेची ताकद होती, भाजपने उमेदवार दिले नाही. त्यामुळे आपआपली ताकद आणि पक्षसंघटनानुसार हे दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याचे चान्सेस फार कमी होतात.

आता ठाकरे गट आणि भाजप ज्या जागांवर आमनोसामने आलेत, तिथंही ही लढत अपघाताने झाल्याचं दिसतंय. जसं की, सांगली लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपारीक मतदारसंघ आहे. पण, कोल्हापूरची जागा शाहू महाराजांमूळे काँग्रेसच्या वाट्याला गेली आणि सांगलीवर ठाकरेंनी दावा ठोकला. म्हणून सांगलीत भाजप विरुद्ध ठाकरे लढत फिक्स झाली.

जळगाव लोकसभा मतदासंघाचही तसंच काहीसं आहे. हा मतदासंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ताब्यात होता. पण, उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला. म्हणून त्यांचे विश्वासू करण पवारांना ठाकरे गटाकडून जळगावातून उमेदवारी जाहीर झाली.

रत्नागिरी-सिंधुदुर्गातूनही ठाकरे विरुद्ध भाजप सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. भाजपच्या तिकीटावर तिथून नारायण राणे मैदानात उतरणार असल्याच्या चर्चाही आहेत.

एकंदरीतच शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजप हे आज जरी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणार असले. तरी दोन्ही पक्ष समविचारी आहेत. उद्धव ठाकरेंनी अद्यापही हिंदूत्वाचा मुद्दा सोडला नाहीये. याच्या तुलनेत कांग्रेस आणि भाजप हे पारंपारीक कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे भाजपला ठाकरेंपेक्षा काँग्रेस आणि काँग्रेला भाजपशी लढणं सोप्प जाऊ शकतं. म्हणून उद्धव ठाकरे भाजप यांची मैदानावरची लढाई फार कमी पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com