Narayan Rane and Kiran Samant Saam Tv
लोकसभा २०२४

Ratnagiri Sindhudurg: किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल, अखेरच्या काही मिनिटांत मतदानासाठी अवतरले; नारायण राणेंना बसणार फटका?

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मतदानाच्या दिवशीच टेंशन वाढलंय. कारण याच मतदारसंघातून शिंदे गटाकडून इच्छूक असलेले किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल होते.

साम टिव्ही ब्युरो

Narayan Rane and Kiran Samant News:

>> भरत मोहळकर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मतदानाच्या दिवशीच टेंशन वाढलंय. कारण याच मतदारसंघातून शिंदे गटाकडून इच्छूक असलेले किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल होते. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी सिंधुदूर्गातून निवडणूक लढवण्यावर किरण सामंत ठाम होते. मात्र भाजपला ही जागा हवी होती. त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यास फार उशीर झाला. अखेर भाजपनं नारायण राणेंना उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज किरण सामंतांनी थेट त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या बॅनरवरील आपले भाऊ उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोटोच हटवला. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला होता.

आताही किरण सामंत नॉट रिचेबल झाल्यानंतर ते ग्रामीण भागात असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची सारवासारव करण्याची वेळ उदय सामंत यांच्यावर आली. तर मतदान संपायला अखेरचे काही मिनिटं शिल्लक असताना किरण सामंत अचानक मतदान केंद्रावर अवतरले. तांत्रिक कारणामुळे आपलं सिम कार्ड बंद असल्याचं कारण किरण सामंत यांनी दिलं.

यामुळे ठाकरे गटाला आयतं कोलित मिळालंय. किरण सामंत यांच्यावर दबाव असल्यानं त्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी करत नाव न घेता राणेंना टोला लगावलाय.

रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात किरण सामंत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी शहरावर त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉट रिचेबल होणं नारायण राणे आणि शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT