Maharashtra Lok Sabha:
आज देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील 11 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. तिसऱ्या टप्प्यात राज्यात 54,09 टक्के मतदान झाले. यातच कोल्हापुरात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झाले. तर बारामतीत सर्वात कमी 47.84 टक्के मतदान झाले आहे.
लातूर – 55.38 टक्के
सांगली – 52.56 टक्के
बारामती – 47.84 टक्के
हातकणंगले – 62.18 टक्के
कोल्हापूर – 63.71 टक्के
माढा – 50.00 टक्के
धाराशिव – 56.84 टक्के
रायगड – ५०.३१ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 53.75 टक्के
सातारा – 54.74 टक्के
सोलापूर – 49.17 टक्के
दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजता संपले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 64.08 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. आसाममध्ये सर्वाधिक 75 टक्के मतदान झाले, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 53 टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगानुसार बिहारमध्ये 56.41 टक्के, छत्तीसगडमध्ये 66.92 टक्के, दादर नगर हवेली आणि दमण दीवमध्ये 65.23 टक्के, गोव्यात 72.98 टक्के, गुजरातमध्ये 55.83 टक्के, कर्नाटकमध्ये 66.26 टक्के, मध्य प्रदेशात 63.48 टक्के मतदान झाले आहे. तर बंगालमध्ये 73.93 टक्के मतदान झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.