Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Lok Sabha Election 2024: शिवसेनेचा गड असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात सेनेच्या फुटीनंतर यंदा दोन शिवसैनिकांमध्येच सामना रंगणार आहे. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्यात ठाण्याची लढत होणार आहे.
कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने
Rajan Vichare Vs Naresh MhaskeSaam Tv
Published On

Rajan Vichare Vs Naresh Mhaske:

>> विकास काटे / संदीप देसाई

शिवसेनेचा गड असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात सेनेच्या फुटीनंतर यंदा दोन शिवसैनिकांमध्येच सामना रंगणार आहे. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्यात ठाण्याची लढत होणार आहे. ठाण्यातील सेना नेते दिवंगत आनंद दिघे यांचे दोन शिष्य एकमेकांसमोर उभे ठाकलेत. त्यामुळे ठाण्याची लढत ही उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालीय. तर दुसरीकडे विचारे आणि म्हस्के यांच्यात वाकयुद्ध जोरदार सुरू झालंय.

एका सभेत बोलताना नरेश म्हस्के यांच्यावर टीका करत ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे म्हणाले होते की, ते म्हणतात, मी करेक्ट कार्यक्रम करतो. मात्र या निवडणुकीत जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार. तुम्ही महापालिकेत बसून काय काम करता आम्हाला माहित नाही का? मला तोंड उगड्याला लावू नका.

कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने
Maharashtra Lok Sabha: राज्यात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी मतदान

यावरच प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के म्हणाले की, ज्यांनी आनंद दिघे यांना त्रास दिला, ज्यांनी दिघे यांच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला. ज्यांनी आनंद दिघे यांच्यासमोर पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी आम्हाला संधी मिळाली त्याचा बदल आम्ही घेतला.

दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 असे सलग राजन विचारे हे विजयी झाले आहेत.

मतांची आकडेवारी - 2014

राजन विचारे - शिवसेना - 5 लाख 95 हजार 364

संजीव नाईक - राष्ट्रवादी - 3 लाख 14 हजार 65

राजन विचारे 2 लाख 81 हजार 299 मतांनी विजयी

कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने
PM Modi In Beed: गोपीनाथ यांच्यासोबत माझं घनिष्ट नातं, PM मोदींकडून मुंडेंच्या आठवणींना उजाळा

मतांची आकडेवारी - 2019

राजन विचारे - शिवसेना - 7 लाख 40 हजार 969

आनंद परांजपे - राष्ट्रवादी - 3 लाख 28 हजार 824

राजन विचारे 4 लाख 12 हजार 145 मतांनी विजयी

मात्र आता परिस्थिती बदललीय. शिवसेनेची दोन शकलं झालीयत. त्यामुळे विचारे आणि म्हस्के दोघांसाठीही निवडणूक आव्हानात्मक असणाराय.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमध्ये कुणाची किती ताकद आहे, हे जाणून घेऊ...

विधानसभांमध्ये कुणाची ताकद

ठाणे शहर - संजय केळकर - भाजप

कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे - शिंदे गट

ओवळा-माजिवडा - प्रताप सरनाईक - शिंदे गट

मीरा भाईंदर - गीता जैन - अपक्ष (भाजप समर्थक)

ऐरोली - गणेश नाईक - भाजप

बेलापूर - मंदा म्हात्रे - भाजप

भाजप - 3 आमदार

भाजप समर्थक अपक्ष - 1 आमदार

शिंदे गट - 2 आमदार

या सगळ्या आकडेवारीवरून ठाणे लोकसभेत महायुतीची ताकद अधिक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिंदे आपला गड राखणार की ठाकरेंचा करिश्मा ठाण्यात कायम राहाणार हा पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com