Nitish Kumar Saam Tv
लोकसभा २०२४

Nitish Kumar: सत्ता हवी तर भाजपला पूर्ण कराव्या लागतील नितीश कुमार यांच्या या ४ मागण्या

National Politics: लोकसभा निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत आल्याने नितीश कुमार यांनी PM मोदींकडे चार महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यावेळी भाजप बहुमतापासून थोडक्यात हुकली आहे. या निकालानंतर नितीश कुमार हे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. यातच नितीश कुमार हे बिहारच्या विकासाच्या अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोरदार सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार मोठ्या मागण्या केल्या आहेत. यात बिहारला विशेष राज्याचा दर्जा, अधिक मंत्री पदे, राज्याला अधिक निधी आणि बिहारमध्ये लवकर विधानसभा निवडणूक घेण्यात यावी, या मागण्याचा समावेश आहे.

सध्या नितीश कुमार बिहारमध्ये मजबूत स्थितीत असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. भाजप, जेडीयू, एलजेपी (आरव्ही) आणि एचएएमने मिळून 30 जागा जिंकल्या आहेत. नितीश कुमार यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या जेडीयू नेत्याने सांगितले की, “बिहारमधील मतदारांमध्ये जेडीयू आणि एनडीएसाठी अनुकूल वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सहा महिन्यांत लवकर निवडणुका घेण्याबाबत आम्ही विचार करत आहोत."

दरम्यान, सध्याच्या राज्य विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर 2025 मध्ये संपणार आहे. बिहारमधील शेवटच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये झाल्या होत्या. ज्यामध्ये जेडीयूने 43 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या.

ज्येष्ठ जेडीयू नेते केसी त्यागी यांनी मंगळवारी सांगितले की, पक्ष केंद्राकडून बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी करत आहे आणि ही मागणी पक्ष आता अधिक जोर देऊन करत आहे. कारण आता जेडीयू केंद्र सरकारमध्ये प्रमुख भागीदार आहे. बिहारला विशेष दर्जा मिळावा अशी आमची इच्छा असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT