Dhule Lok Sabha : शेतकऱ्यांनी कांद्याची माळ गळ्यात घालत केला जल्लोष; शोभा बच्छाव यांच्या विजयानंतर जल्लोष

Manmad Nashik News : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष होता. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा रथ तयार करुन सरकार विरोधात रान उठवले होते
Dhule Lok Sabha
Dhule Lok SabhaSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : धुळे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांचा अखेरच्या क्षणी विजय झाला. यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरवात केली. दरम्यान याच मतदार संघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत कांद्याची माळ गळ्यात घालून जल्लोष करण्यास सुरवात केली. 

Dhule Lok Sabha
Eknath Khadse : विजय दिसत नसल्याने विरोधकांचा रडीचा डाव सुरू आहे; एकनाथ खडसे

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरोधात (farmer) शेतकऱ्यांमध्ये रोष होता. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा रथ तयार करुन सरकार विरोधात रान उठवले होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असलेला हा रोष लोकसभा निवडणुकीत दिसून आला. एकुणच दिंडोरी व धुळे लोकसभा मतदार कांदा उत्पादकांच्या रोषाला भाजपा (BJP) उमेदवारांना सामोरे जावे लागले असल्याची चित्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाहण्यास मिळाले. 

Dhule Lok Sabha
Heat Stroke : जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

फटाक्यांची केली आतिषबाजी 

धुळे लोकसभा मतदार (Lok Sabha Election) संघात शोभा बचाव यांचा विजय झाल्याने मतदार संघात येणाऱ्या सटाणा शहरालगतच्या मोरेनगर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याची माळ घालत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com