Eknath Shinde Saam Digital
लोकसभा २०२४

Eknath Shinde: हेमंत गोंडसेंच्या उमेदवारीला छगन भुजबळांचा विरोध का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Maharashtra Politics 2024: एकनाथ शिंदे यांनी तिकीट मिळेपर्यंत प्रत्येकाची इच्छा असते. मात्र भुजबळ माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत एकदिलाने काम करणार असल्यांच म्हटलं आहे.

Sandeep Gawade

नाशिकमध्ये प्रचंड राजकीय घडामोंडींनंतर महायुतीतून अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. आज त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. नाशिकमधूनच उमेदवारीच्या शर्यतीत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हेमंत गोडसेंसोबत राहणार का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्वावर एकनाथ शिंदे यांनी तिकीट मिळेपर्यंत प्रत्येकाची इच्छा असते. मात्र भुजबळ माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत एकदिलाने काम करणार असल्यांच म्हटलं आहे.

फडणवीसाच्या बोलण्यात सत्यता

फडणवीस जे बोलले त्यामध्ये सत्यता आहे वस्तुस्थिती आहे. कारण जेव्हा आम्ही बाहेर गेलो तेव्हा त्यांनी हे प्रयत्न केले. माझ्यासाठीही प्रयत्न केले की तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो, तुम्ही पुन्हा या. पण मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हा निर्णय घेतला नव्हता. जेव्हा विचारांची फारकत होते बाळासाहेबांचे विचारांना जेव्हा मूठमाती दिली जाते, त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो. आम्हालाही निरोप दिला, दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता आम्ही सर्वच येतो. अख्खी शिवसेना येते, पण त्यांच्यासोबत शिवसेना राहिलेली नव्हती. 50 लोक माझ्यासोबत होते, त्यामुळे देवेंद्रजी जे बोलले त्यात सत्यता आहे वस्तू स्थिती आहे. आणखी काय काय आहे त्यावर मी आता बोलू इच्छित नाही.

आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही. निवडणुका आल्या मग काम करायचं असं नाही, आम्ही 24 तास काम करतो. महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत. फक्त घरी बसून काम करत नाही फेसबुक लाईव्ह करत नाही. त्यामुळे आमचं काम 24 तास सुरू असतं. आमचे कार्यकर्ते 24 तास काम करणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे, त्यामुळे आमचा विजय पक्का आहे.

हेमंत गोडसे यांचा अर्ज भरण्यासाठी महायुतीची प्रचंड अशी रॅली आपण पाहिली. महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी, नेते कार्यकर्ते आज रॅलीमध्ये कडाक्याच्या उन्हातही रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावरून आपण अंदाज लावू शकता की हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेसला जे 50 -60 वर्षात काम करता आलं नाही ते मोदींनी दहा वर्षात केलं. देशाला विकासाकडे नेण्याचे काम केलं. राज्यात महायुती सरकारने देखील सर्वसामान्यांसाठी जे काम केलंय त्याची पोचपावती या निवडणुकीत नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

SCROLL FOR NEXT