Ramdas Athawale : भाजप खरंच संविधान बदलणार का? रामदास आठवलेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

Lok Sabha Election 2024 : भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे ते बोलत होते.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam Digital

संविधान वाचवणे आणि मजबूत करणे ही भाजपची भूमिका राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याची त्यांची भूमिका आहे. मात्र भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे प्रचार सभा पार पडली. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

भाजपने देशात ४०० पारचा नारा देत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचा या निवडणुकीत प्रचार सुरू केला आहे. त्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांना संविधान बलण्यासाठीच ४०० जागा हव्या आहेत, असा विरोधकांचा दावा आहे. त्यावरून आज रामदास अठवले यांनी भाजप संविधान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र विरोध जाणिवपूर्वक खोटा प्राचार करत असल्याचा आरोप केला.

Ramdas Athawale
Eknath Shinde : हेमंत गोंडसेंच्या उमेदवारीला छगन भुजबळांचा विरोध का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही सुद्धा भाजप आणि नरेंद्र मोदींची भूमिका आहे. भाजपचा आरक्षण किंवा लोकशाहीचा विरोध नाही परंतु विरोधक जाणिव पूर्वक भाजपच्या विरोधात खोटा प्रचार केला जातोय. तरीही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला किमान 40 जागा मिळतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

Ramdas Athawale
संभाजीराजे छत्रपती अभ्यासू, त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं : चंद्रकांत पाटील, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com