संभाजीराजे छत्रपती अभ्यासू, त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं : चंद्रकांत पाटील, Video

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या माेदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
chandrakant patil criticizes sambhajiraje chhatrapati on constitution statement
chandrakant patil criticizes sambhajiraje chhatrapati on constitution statementSaam Digital
Published On

Satara Lok Sabha Election :

संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) हे अभ्यासू आहेत. त्यांच्याकडून अयाेग्य विधानाची अपेक्षा नव्हती. घटना बदलता येत नाही. घटनेत वेळोवेळी दुरुस्ती होते. यापूर्वी सर्वाधिक दुरुस्त्या ह्या 96 वेळा काँग्रेसने केल्या आहेत. त्यामुळे भाजप घटना बदलणार हा कांगावा असल्याची प्रतिक्रिया आज (गुरुवार) भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. पाटील हे सातारा लाेकसभात मतदारसंघातील कराड दक्षिण येथे खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांच्या प्रचारासाठी आले हाेते.

भाजपाला 400 पार बहुमत हे घटना बदलण्यासाठी हवं असल्याचे विधान संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत केले हाेते. त्यावर आज साम टीव्हीशी बाेलताना चंद्रकांत पाटील म्हणाले 90 वेळा काॅंग्रेसने वेगवेगळी बिगर काॅंग्रेसी सरकार बरखास्त केली. घटना कधीही बदलता येत नाही. घटनेत दुरुस्ती करता येते. नेहरुंपासून आत्तापर्यंत 106 वेळा घटनेत दुरुस्ती झाली आहे.

chandrakant patil criticizes sambhajiraje chhatrapati on constitution statement
Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

पाटील पुढे बाेलताना म्हणाले माेदी आणि वाजपेयी यांच्या कार्यकाळात 10 वेळा घटना दुरुस्ती झाली. माेदींनी महिलांना 33 टक्के आरक्षण आणले, अटलबिहारी वाजपेयींनी सहा ते 14 वयाेगटातील मुलांना माेफत व सक्तीचे शिक्षण दिले. या दुरुस्त्या आहेत.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

काॅंग्रेसने लाेकांनी निवडून दिलेली राज्य सरकार केंद्राला नकाे असलेली सरकारं 90 वेळा बिगर काॅंग्रेसी बरखास्त केली. माेदींनी एकदाच केले. जेव्हा 370 कलम आणायचे हाेते तेव्हा जम्मूचे केल्याचे पाटील यांनी नमूद केले. घटना दुरुस्ती करता येते घटनेत बदल करणे हा माेदींचा हेतू नाही असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी गोवरे ग्रामस्थांशी संवाद साधत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेली दहा वर्षे देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि बहुजन वर्गाला केंद्रस्थानी ठेवून मोदींनी अनेक समाजोपयोगी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी अधिकाधिक मतदान करावे असे आवाहन केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

chandrakant patil criticizes sambhajiraje chhatrapati on constitution statement
छत्रपतींच्या गादीचा मान ठेवा म्हणता अन् साताऱ्यातून उमेदवार देता; नितेश राणे कुणावर संतापले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com