Prithviraj Chavan On Sanjay Mandlik Saam Tv
लोकसभा २०२४

Prithviraj Chavan: संजय मंडलिक यांचे हे उद्गार भाजपच्या ग्रँड स्टॅटेजीचा भाग तर नाही ना?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

Sanjay Mandlik Controversial Statement: 'कोल्हापूरच्या गादी विषयी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काढलेले उद्गार हे अत्यंत निंदनीय आहे. त्यांना कोल्हापूरकर उत्तर देतील.', या भाषेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संजय मंडलिक यांचा समाचार घेतला आहे.

Priya More

Prithviraj Chavan On Sanjay Mandlik:

'कोल्हापूरच्या गादी विषयी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी काढलेले उद्गार हे अत्यंत निंदनीय आहे. त्यांना कोल्हापूरकर उत्तर देतील.', या भाषेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी संजय मंडलिक यांचा समाचार घेतला आहे. तसंच, 'संजय मंडलिक यांचे हे उद्गार भाजपच्या ग्रँड स्टॅटेजीचा भाग तर नाही ना?', असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनविषयी सलोख्याचे संबंध आहेत असं जरी बोलत असले तरीही चीनने बळकवलेल्या जागेवर का बोलत नाहीत?', असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानांना विचारला आहे. 'भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला होता. मात्र आजही चीनकडून वस्तू आयात होत आहेत. जगभरातील अनेक स्वायत्त संस्थांनी भारताच्या लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त केलीय.', असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

'माढाच्या जागेचा तिढा जवळपास संपला आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. याविषयी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 'पक्षात प्रवेश होतील पण जनतेमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास आहे. तर महायुतीच्या पराभवाची खात्री स्पष्टपणे दिसून येत आहे.' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धार्मिक विधानाचा देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत. राम मंदिराच्या विषयावर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की, 'राम मंदिर हा विषय दोन खासगी ट्रस्टचा विषय आहे. राम मंदिर जे बांधले आहे ते मूळ जागेपासून चार किलोमीटर दूर अंतरावर बांधले.', असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT