Yavatmal : हातपाय बांधून कारमध्ये कोंबलं, मुलं पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी तरुणांना तुडवलं; दोघे गंभीर जखमी

Yavatmal News : यवतमाळमध्ये मुल पळवणारी टोळी समजून सहा तरुणांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील अनर्थ टाळला आहे.
Yavatmal : हातपाय बांधून कारमध्ये कोंबलं, मुलं पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी तरुणांना तुडवलं; दोघे गंभीर जखमी
Yavatmal Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • यवतमाळमध्ये मुल पळवणारी टोळी समजून मारहाण

  • सहा तरुण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

  • नागरिकांनी कारचा पाठलाग करून हल्ला केला

  • घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळमध्ये मुल पळवणारी टोळी समजून काही तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सहा पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे, तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याप्रकरणी पुढील चौकशी पोलीस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील पाच जण उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी मुकुटबन येथे गेले. मात्र ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे होते, ते नसल्याने तरुणांनी त्याच्या जवळच्या नातेवाईकाला हातपाय बांधून गाडीत कोंबलं आणि घेऊन निघाले.

Yavatmal : हातपाय बांधून कारमध्ये कोंबलं, मुलं पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी तरुणांना तुडवलं; दोघे गंभीर जखमी
Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

यादरम्यान कामटवाडा जवळ नागरिकांना संशय आल्याने त्यांनी कार थांबवायला सांगितली. कार थांबवली असता त्यात संशयास्पद एक व्यक्ती कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मुलं पळविणारी टोळी समजून नागरिकांनी कारचा पाठलाग सुरू केला.

घाटंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढुर्णा इथे वाहन थांबवलं, त्यातून सर्वच जण पळाले एक जण सापडला. त्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. या घटनेत सहा पैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com