Sakshi Sunil Jadhav
पेंग्विन हा जगातला सर्वात वेगळा आणि आकर्षक पक्षी मानला जातो. तो उडू शकत नसलातरी पाण्यात खूप वेगाने पोहण्याची क्षमता त्यांच्यात असते. चला त्यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.
बहुतेक पेंग्विन दक्षिण गोलार्धात राहतात. म्हणजे अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यांवर ते आढळतात.
पेंग्विन पक्षी असले तरी ते उडू शकत नाहीत. त्यांच्या पंखांची रचना पोहण्यासाठी योग्य असते, त्यामुळे ते पाण्यात वेगाने पोहतात.
पेंग्विन साधारणपणे 15 ते 20 वर्षे जगतात. काही प्रजाती योग्य परिस्थितीत 25 वर्षांपर्यंतही जगू शकतात.
पेंग्विनच्या प्रजातींनुसार त्यांची उंची वेगवेगळी असते. काही पेंग्विन 30 ते 40 सेंटीमीटर इतके छोटे असतात, तर काही 1 मीटरपर्यंत उंच असू शकतात.
पेंग्विन हे समुद्रातील अन्न खातात. त्यांच्या आहारात मासे, क्रिल , लहान समुद्री जीवआणि स्क्विड मासा यांचा समावेश असतो.
पेंग्विन पाण्यात जवळपास 6 ते 15 किमी प्रतितास वेगाने पोहू शकतात. काही प्रजाती यापेक्षा जास्त वेगाने सुद्धा पोहतात.
पेंग्विन मादी साधारण एक किंवा दोन अंडी घालतात. नर आणि मादी दोघंही अंडी उबवण्याची जबाबदारी घेतात.
अंडी फुटल्यानंतर आई-वडील दोघंही पिल्लांना अन्न आणून देतात. काही प्रजातींमध्ये नर पेंग्विन अंडे पायांवर ठेवून उबवतो.
पेंग्विनच्या शरीरावर दाट पिसं आणि त्वचेखाली चरबीचा थर असतो. त्यामुळे अत्यंत थंड हवामानातही त्यांचे शरीर उबदार राहते.