लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखांची घोषणा झाल्यापासून सर्व राजकीय पक्ष प्रचार सभा, बैठकांमध्ये व्यस्त आहेत. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत. अशामध्ये पुण्यातील बालगंधर्व येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar), विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये 'अबकी बार 45 पार, पण आपण 48 पर्यंत जाऊ शकतो.', असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, 'मुरली आणि आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील. कारण आपले कार्यकर्ते चार्ज आहेत. आपली ताकत मोठी आहे. आपल्या महायुतीचं वातावरण राज्यभर आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे मध्ये त्यात काही विघन आली पण आपण पून्हा युती केली आणि आता अजित पवार सोबत आले आपली महायुती मजबूत झाली.'
'अनेक लोकं म्हणत होते की सरकार पडणार. पण आता बंद झालं आहे असं म्हणणं. आता मनसेने आपल्याला पाठिंबा दिला आहे. मोदींजींच्या कामामुळे आपली महायुती भक्कम होत चालली आहे. संपूर्ण देशात मोदी लाट आहे. लोकांनी ठरवलं आहे की मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. अबकी बार 45 पार. पण आपण 48 पर्यंत जाऊ शकतो. आपल्या 4 ही उमेदवार आहेत त्या चारही मतदार संघात महायुतीची लाट आहे.', असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
तसंच, 'मुरली मोहोळ यांना बापट यांचा वारसा पुढे चालवायचा आहे. माझहे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गिरीष बापट मला मोठ्या भावासारखे होते. आता आपला खासदार पुण्यातून दिल्लीला जाणार आहे. इथं भाऊ तात्या कुणी नाही मुरली अण्णाच निवडून येणार. मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. पण ते वाटत नाहीत पैलवान आहेत. त्यांना कुठला डाव काधी टाकायचं हे सर्व माहिती आहे आणि स्वार्थासाठी राजकीय आखाडा बदलणारा माणूस आपल्याला नकोय.' असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी रविंद्र धंगेकर आणि वसंत मोरे या दोन्ही उमेदवारांवर नाव न घेता टीका केली आहे.
'अजितदादा बोलताना म्हणाले डोक्यावर बर्फ ठेवा ते ठेवतात कारण त्यांना असे अनेक अनुभव आले आहेत. काँग्रेसरुपी रावणाचा अंत आपल्याला या निवडणुकीत करायचा आहे. रोज आरोप करतात आम्ही काम करत राहू. आपले चारही उमेदवार निवडून येतील यात शंका नाही. आपले कार्यकर्ते स्वतः उमेदवार म्हणून काम करतात. दिवसरात्र ते काम करतात. तुम्ही निवडून आले की त्यांची छोटी कामे करा. म्हणजे कधीही अडचण येणार नाही. आपण कोरोना काळात काम केलं. काही लोक घरात बसून फेसबूक लाइव्ह करायचे आणि आता ते मोदींवर टीका करतात. आता मोदींची वक्रदृष्टी जर यांच्यावर पडली. तर फेसबुकवर बोलणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल. आपण काय बोलताय हे भान ठेवलं पाहिजे.', असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.