'आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते.', असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे. सासवड येथे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. या सभेमध्ये भाषणादरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे.
सासवड येथील सभेदरम्यान बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, 'ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक देश कोणत्या पध्दतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. लोकांच्या सहमतीने आणि लोकशाही मार्गाने सध्या देश चालवायची गरज आहे.', असे मत व्यक्त करत शरद पवार यांनी पीएम मोदींवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार यांनी पुढे सांगितले की, 'यांना देशाची घटना बदलायची आहे. त्यामुळेच ४०० पारचा नारा देत आहेत. पीएम मोदी ठिकठिकाणी जातात आणि भाषण करतात. एकदा त्यांनी दिल्लीत भाषण केलं. शेतीच्या क्षेत्रात ऐतिहासिक काम शरद पवारांनी केलं. तसंच, पवारांचा हात धरुन मी राजकारणात पावलं टाकली असं देखील ते म्हणाले होते. टीका करायचा त्यांचा अधिकार आहे.', असा टोला देखील त्यांनी मोदींना लगावला आहे.
तसंच, 'ज्यांनी irrigation बाबत आरोप केले. घोटाळ्याचे आरोप केले. ते आज सगळे कुठे आहेत? यावरून तुम्हाला मोदींच्या बोलण्याचा अर्थ कळला असेल. हुकुमशाहीला निमंत्रण देणाऱ्या प्रवृत्तीला बाजूला ढकलायचे असेल तर याचा पराभव केला पाहिजे. नुसती तुतारी नाही. तर तुतारी हातात घेऊन उभा असलेला माणूस ही आपली खूण आहे. सुप्रियाला निवडून द्या.', असे आवाहन त्यांनी सासवडकरांना केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.