Sanjay Raut: महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला!

Maharashtra Loksabha Election: सासवडच्या सभेआधी पुण्यामध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Sanjay Raut Press Conference
Sanjay Raut Press ConferenceSaam Tv

सागर आव्हाड, पुणे|ता. २८ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. या सभेआधी पुण्यामध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

"महायुतीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली नाही. शिवसेना फडणवीस गटाने कल्याण- डोंबिवली तसेच नाशिकमध्येही उमेदवार दिले नाहीत. अनेक ठिकाणी औपचारिकता म्हणून उमेदवार दिलेत. जसे उत्तर मध्य मुंबईत उज्वल निकम यांना उमेदवारी दिली. उज्वल निकम जरी उमेदवार असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल, तसेच महाविकास आघाडी राज्यात ३० आणि ३५ जागा जिंकेल," असा दावाही संजय राऊत यांनी केला.

तसेच "जिंकण्याची खात्री आहे तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस धमक्या का देतात? उत्तम जानकरांच्या नावाने धमक्या देण्यात आल्या. लोकशाही आहे, लोकांना ठरवू द्या. बारामती शिरूर मतदार संघात अजित पवार धमक्या देतात. त्यांना नोटीस देतात. मात्र ४ जूनला तुम्हाला जनता बघून घेईल," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut Press Conference
Sangli Constituency : प्रकाश शेंडगे यांच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक; रायकीय वर्तुळात खळबळ

"बारामतीत शरद पवारांचा पराभव केला हे देशाला दाखवायचं असेल तर ते शक्य नाही. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. आम्ही सगळी सुप्रिया सुळेंची भावंडं आहोत. बारामतीत तळ ठोका, तंबु ठोका, काहीही होणार नाही," असा टोलाही संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला.

Sanjay Raut Press Conference
Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com