Sangli Constituency : प्रकाश शेंडगे यांच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक; रायकीय वर्तुळात खळबळ

Lok Sabha Election : काश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभा उमेदवार आहेत. हॉटेल ग्रेट मराठासमोर त्यांची गाडी उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे. कारच्या काचेवर धमकी बजा इशारा देण्यात आला आहे.
Sangli Constituency
Sangli ConstituencySaam TV

विजय पाटील

ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच गाडीवर शाई फेकण्यात आली आहे. गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकली असून पुढे चपलांचा हार घालण्यात आलेला आहे.

Sangli Constituency
OBC Bahujan Party : निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एक नवीन पक्ष, राज्यातील ओबीसी नेत्याने केली घोषणा

प्रकाश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभा उमेदवार आहेत. हॉटेल ग्रेट मराठासमोर त्यांची कार उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला. कारच्या काचेवर धमकी वजा इशारा देखील देण्यात आला आहे.

भुजबळांनी जशी नाशिकमध्ये माघार घेतली, तशी तुम्ही माघार घ्या. मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. एक मराठा लाख मराठा असे पत्रक कारच्या काचेवर चिकटवण्यात आले आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात मराठा समाजातल्या तरुणांकडून ही दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना खरशिंग गावामध्ये मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांकडून गावात प्रचार साहित्य वाटू देण्यात आले नाही. तसेच आपणाला आणि छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या भावनेतून शिवीगाळ देखील केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे.

Sangli Constituency
OBC - VJNT Girl students: मोठी बातमी! 1 जूनपासून महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थिनींची 100 टक्के फी राज्य सरकार भरणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com