OBC - VJNT Girl students: मोठी बातमी! 1 जूनपासून महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थिनींची 100 टक्के फी राज्य सरकार भरणार

Maharashtra government: येत्या 1 जूनपासून महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजेएनटी तसेच अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनींची (मुलींची) 100 टक्के फी राज्य सरकार भरणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
OBC and VJNT Girl students
OBC and VJNT Girl studentsSaam Tv
Published On

OBC and VJNT Girl students:

ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थिनींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 1 जूनपासून महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजेएनटी तसेच अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनींची (मुलींची) 100 टक्के फी राज्य सरकार भरणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्रातील सर्व मुलींना फी नसल्यामुळे शिकता येत नाही, असे आता होणार नाही. मुलींच्या फीसाठी आम्ही 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीमध्ये याबाबतचा निर्णय झाला असून लवकरच याचा जीआर निघणार आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

OBC and VJNT Girl students
Lok Sabha Election 2024: मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला; 48 पैकी 39 जागांचं गणित जुळलं, मात्र मुंबईच्या 2 जागांसाठी लटकलं!

ते म्हणाले की, त्याचबरोबर ज्या मुला-मुलींना होस्टेल मिळालेले नाही. अशाना निर्वाह भत्त्याची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रो सिटीमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दरमहा 6 हजार, त्यापेक्षा छोट्या शहरांमध्ये 5300 तर, तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांना 3800 रुपये प्रति महिना निर्वाह भत्ता मिळणार आहेत. (Latest Marathi News)

त्यांनी पुढे सांगितलं की, या निर्णयामुळे शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी आशा आहे. हा भत्ता थेट डिबीटीद्वारे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

OBC and VJNT Girl students
Ajay Maharaj Baraskar: मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न

ते म्हणाले की, ''पंतप्रधान मोदींनी पीएम उच्चस्तर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देशातील विद्यापीठांना 3 हजार 800 कोटी रुपये निधी दिला आहे. तर महाविद्यालयांना 5 हजार कोटी रुपये जाहीर होणार आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तेव्हा ज्या विद्यापीठामध्ये 100 कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरला जाईल, त्या ठिकाणी मोदीजींना आम्ही बोलवणार आहोत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com