Lok Sabha Election 2024: मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला; 48 पैकी 39 जागांचं गणित जुळलं, मात्र मुंबईच्या 2 जागांसाठी लटकलं!

Maha Vikas Aghadi: एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुटला आहे, अशी माहिती मिळत आहे.
Sharad Pawar , Uddhav Thackeray & Rahul Gandhi
Sharad Pawar , Uddhav Thackeray & Rahul GandhiSaam Tv

Lok Sabha Election 2024:

एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुटला आहे, अशी माहिती मिळत आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात विभागणी झाली आहे.

एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने याला दुजोरा दिला आहे. उर्वरित नऊ जागांवर अद्याप वाटाघाटी सुरू आहेत. यातील आठ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये अद्याप चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar , Uddhav Thackeray & Rahul Gandhi
Ajay Maharaj Baraskar: मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली तेव्हा महाविकास आघाडीमध्ये जागांची वाटाघाटी झाली, असं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील लोकसभेच्या ज्या जागांवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये चुरस आहे त्यामध्ये मुंबईतील दोन जागा, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा जागांचा समावेश आहे. या दोन जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्ही पक्ष दावा करत आहेत. (Latest Marathi News)

दुसरीकडे, महाविकास आघाडीमधील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाच जागांची मागणी केली आहे. यावरून मविआमधील पक्षांमध्येही खडाजंगी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील उर्वरित तीन पक्ष प्रकाश आंबेडकरांना दोन जागा देण्यास तयार आहेत.

Sharad Pawar , Uddhav Thackeray & Rahul Gandhi
Google Pay बाबत मोठी अपडेट! जूनमध्ये बंद होणार अ‍ॅप, त्याआधी करा हे महत्वाचं काम

यातच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने 47 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीने 288 पैकी 234 जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना कुठेही खातेही उघडता आले नव्हते. लोकसभा निवडणुकीत वंचितला 6.92 टक्के मते मिळाली असली तरी विधानसभा निवडणुकीत 4.6 टक्के मते मिळाली होती. यात मोठी गोष्ट म्हणजे वंचित 10 विधानसभा जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती.

ठाकरे गट आणि काँग्रेस समोरासमोर?

दक्षिण-मध्य मुंबई आणि उत्तर-पश्चिम मुंबई या लोकसभेच्या दोन जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गट आपला दावा करत आहेत. गेल्या निवडणुकीत उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर निवडणूक जिंकले होते. तर काँग्रेसचे संजय निरुपम दुसऱ्या क्रमांकावर होते. गजानन हे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यामुळे या जागेवर काँग्रेस आपला दावा करत आहे. मात्र यासाठी ठाकरे गट तयार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com