Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Sharad Pawar On PM Modi: पंडित नेहरू यांनी देशात स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्ष तुरंगात घालवली आणि स्वातंत्र्यानंतर अनेक विकास कामे करून देशाला पुढे नेण्याचे काम पंडित नेहरू यांनी केला आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करतात, असा हल्लाबोल शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.
Sharad Pawar Speech
Sharad Pawar On PM ModiSaam TV
Published On

Sharad Pawar On PM Modi:

>> हिरा ढाकणे

पंडित नेहरू, राजीव गांधी , राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहे. पंडित नेहरू यांनी देशात स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्ष तुरंगात घालवली आणि स्वातंत्र्यानंतर अनेक विकास कामे करून देशाला पुढे नेण्याचे काम पंडित नेहरू यांनी केला आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करतात, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ दहिवाडी जिल्हा सातारा येथे आयोजित प्रचार सभेत शरद पवार बोलत होते.

Sharad Pawar Speech
Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

शरद पवार म्हणाले की, समर्थन देण्यासाठी आपण भर उन्हात आला आहात, जवाहरलाल नेहरू ते मनोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये हा देश एकसंघ राहिला आणि निवडणुका चांगल्या पार पडल्या हा लोकशाहीचा विजय होता. मात्र यंदा स्थिती वेगळी आहे, आजच्या पंतप्रधानांना संवादावर विश्वास नाही. विरोधी पक्षासोबत बोलत नाहीत. या उलट वाजपेयींच्या काळात परिस्थिती होती. मोदी दहा वर्ष पंतप्रधान राहिले मात्र या काळात त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली नाही असे पवार यांनी म्हटले आहे.

पुढे पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघात सभा होती त्या ठिकाणी न्यू यॉर्क टाईमचे प्रतिनिधी माहिती घेण्यासाठी आले होते. जगाचे या निवडणूकीकडे लक्ष लागले आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. जगातील अनेक नेत्यांनी या देशाची लोकशाही पाहिली. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, यांची सत्ता पाहिली असेही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Speech
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

पवार म्हणाले की, समर्थन देण्यासाठी आपण भर उन्हात आला आहात, जवाहरलाल नेहरू ते मनोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये हा देश एकसंघ राहिला आणि निवडणुका चांगल्या पार पडल्या हा लोकशाहीचा विजय होता. मात्र यंदा स्थिती वेगळी आहे. आजच्या पंतप्रधानांना संवादावर विश्वास नाही. असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, तसेच गेली १० वर्ष या देशाचे सरकार नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीच्या हातात आहे. याआधी मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ११० वेळा पत्रकार परिषद घेतल्या. मात्र नरेंद्र मोदींनी एकदाही माध्यमांशी संवाद साधला नाही. याआधी संसदेतील अधिवेशनाला पंतप्रधान जातीने हजर राहायचे, त्यांचा लोकशाहीवर विश्वास होता, मात्र सध्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे. असे पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, जागृत राहून परिवर्तन करावे लागेल. लोकशाहीवर संकटाचे ढग दिसत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी चांगलं काम केलं आहे. मोदी सरकारविरुद्ध टिका केली म्हणून आज केजरीवाल तरुंगात आहेत. चांगले काम करणारे राष्ट्रवादीचे मंत्री सहा महिने तरुंगात होते. संजय राऊत तुरुंगात होते. शशिकांत शिंदे हे नवी मुंबई मार्केट कमिटीत उत्तम काम करतात. मात्र त्यांना देखील काहीना काही करून अडवलं जात आहे. त्यांना निवडणुकीत थांबवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. शशिकांत शिंदे यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com