Chhagan Bhujbal News: मनोज जरांगे PM मोदींपेक्षाही मोठे नेते, त्यांना अख्खा हिंदुस्तान घाबरतो; छगन भुजबळांचा टोला

Chhagan Bhujabal Criticized Manoj Jarange Patil: नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थेट मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला.
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News Saam Tv

'मनोज जरांगे PM मोदींपेक्षाही मोठे नेते असून त्यांना अख्खा हिंदुस्तान घाबरतो.', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी लगावला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थेट मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला. 'मी कोणालाच्या बापाला घाबरत नाही, उमेदवारी जाहीर करायला उशिर झाला म्हणून मी नाशिकमधून माघारी घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, 'जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदीसाहेबांपेक्षा फार मोठा नेता. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्तान जरांगेंना घाबरतो. त्यांची अक्कल हुशारी किती. काहीही बडबड करतात. ते नाशकात येऊन बोलतात ओपनची जागा आहे ओबीसींनी लढू नये. बीडमध्ये जाऊन म्हणतात ओपनची जागा आहे ओबीसींनी लढू नये. पण त्यांना एवढेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत, लोकसभेत आरक्षण नाही.'

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
Thane Loksabha: ठाण्याची जागा शिवसेनेकडेच! CM शिंदेंचा विश्वासू शिलेदार उतरणार मैदानात; लवकरच घोषणा?

छगन भुजबळ यांनी पुढे सांगितले की, 'आता आम्हीसुद्धा येवला ओपन आहोत. तिथून निवडून येतो. समीरभाऊसुद्धा ओबीसी असून इथूनच खासदार म्हणून निवडून आले. ते तर पूर्वी असं पण बोलले होते की मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही. पण मोदीसाहेबांच्या तर एवढ्या जंगी सभा होतात. सध्या ते गिनतीत सुद्धा नाहीत. उगाच बेडकासारखं फुगायचं काही कारण नाही.', असा टोला त्यांनी जरांगे पाटील यांना लगावला आहे.

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
Madha Lok Sabha: माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

नाशिकमधून माघार घेतल्याबद्दल देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी सांगितलं होतं 20 मे पर्यंत तरी उमेदवारी जाहीर करा म्हणून. अर्ज भरायला देखील सुरुवात झाली. मला वाटलं माझ्यामुळे अडला असेल म्हणून मी दूर झालो. आता तरी लवकर निर्णय होईल असं मला वाटतं. आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्याच्या दोन्ही जागा निवडून आणू.', असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

तसंच, प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी छगन भुजबळ यांनी सांगितले की, 'प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर हल्ला झाला हे अतिशय अयोग्य आहे. प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहेत. प्रकाश शेंडगे किंवा कुठल्या इतर पक्षाचे उमेदवार असेल तर लोक ठरवतील त्यांना किती मत द्यायचे. दादागिरी करून कोणाला थांबवू शकत नाही. प्रकाश शेंडगे यांना पोलिस संरक्षण दिले पाहिजे.', अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
Pune News: आईच्या कुशीत झोपलेलं ७ महिन्यांचं बाळ अज्ञाताने चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com