Pune News: आईच्या कुशीत झोपलेलं ७ महिन्यांचं बाळ अज्ञाताने चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

Pune baby Kidnapping: पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ७ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Pune baby Kidnapping
Pune baby KidnappingSaam TV

Pune 7 months old baby Kidnapping

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ७ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. श्रावण अजय तेलंग, असे अपहरण झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune baby Kidnapping
Gondia News: अल्पवयीन मुलीचं सिनेस्टाईल अपहरण; सामूहिक अत्याचार करुन हत्या; चौघे पोलिसांच्या ताब्यात

याबाबत अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दाम्पत्य मूळचे भुसावळचे असून ते पुण्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. शनिवारी मध्यरात्री तेलंग दाम्पत्य पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते.

त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा ७ महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली. तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध घेतली असता, तो कुठेही दिसून आला नाही. यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. यामध्ये ७ महिन्यांच्या श्रावणचे अपहरण करणारी व्यक्ती दिसून आली.

पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरू केला असून स्टेशन परिसरातील रिक्षाचालक, उपहारगृहचालक, फेरीवाल्यांकडे चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बंडगार्डन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Pune baby Kidnapping
Mumbai News: मुंबईत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; भांडूपमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com