Thane Loksabha: ठाण्याची जागा शिवसेनेकडेच! CM शिंदेंचा विश्वासू शिलेदार उतरणार मैदानात; लवकरच घोषणा?

Loksabha Election 2024: जागा वाटपाच्या तिढ्यात एकनाथ शिंदेंनी बाजी मारत ठाणे लोकसभेची जागा स्वतःकडे राखण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Tv

विनय म्हात्रे, मुंबई|ता. २८ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. एकीकडे लोकसभेचे दोन टप्प्यांतील मतदान झाले तरी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील उमेवारही अद्याप ठरलेला नाही. यावरुनच विरोधक शिंदेंवर निशाणा साधत असतानाच ठाणे लोकसभेबाबत सर्वात महत्वाची बातमी समोर आली असून ठाण्याची जागा शिंदे गट लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाणे लोकसभा मतदार संघ एकनाथ शिंदेंची शिवेसनाच लढणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. जागा वाटपाच्या तिढ्यात एकनाथ शिंदेंनी बाजी मारत ठाणे लोकसभेची जागा स्वतःकडे राखण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर ठाण्यातून शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याबाबत एकमत झाल्याची माहितीही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. ठाणे लोकसभेसाठी प्रताप सरनाईक, मिनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता.. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

दरम्यान, ठाणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात आता महायुतीकडून नरेश म्हस्के यांना उतरवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ठाण्यात दोन कट्टर शिवसैनिकांमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

CM Eknath Shinde
Ahmednagar Lok Sabha: ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, भर चौकात झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com