Fatty Liver Diet, World Liver Day 2024
Fatty Liver Diet, World Liver Day 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

World Liver Day 2024 : तरुणांमध्ये वाढतेय फॅटी लिव्हरची समस्या, कशी घ्याल आरोग्याची काळजी?

कोमल दामुद्रे

Fatty Liver Disease :

दरवर्षी १९ एप्रिलला जागतिक यकृत दिवस साजरा केला जातो. या दिवशी यकृताशी संबंधित आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

नॉन- अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा यकृताशी संबंधित आजारांपैकी (Disease) सर्वात सामान्य आजार आहे. ज्यामुळे जगभरात लाखो लोक त्रस्त आहेत.

या आजाराच्या रुग्णांमध्ये पूर्वीच्या तुलनेत जास्त वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. फॅटी लिव्हरचा आजार कसा होतो? यावर कशी मात करता येईल? जाणून घेऊया

1. फॅटी लिव्हरची कारणे

  • लठ्ठपणा

  • उच्च कोलेस्टरॉल

  • रक्तातील उच्च ट्रायग्लिसराइड पातळी

  • झोप श्वसनक्रिया बंद होणे

  • PCOS

  • टाइप-2 मधुमेह (Diabetes)

  • मेटाबॉलिक सिंड्रोम

  • दारू पिणे

  • हायपोथायरॉईडीझम

2. कशी घ्याल काळजी?

1. आरोग्यदायी आहार

आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त आहार किंवा जंक फूडचे प्रमाण जास्त असल्याने फॅटी लिव्हरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यासाठी हिरव्या भाज्या, फळे, दही, मासे, बीन्स, चिकन, अंडी इत्यादींचा आहारात (Diet) समावेश करा.

2. वजन

जास्त वजनामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी सकस आहार आणि व्यायाम करा.

3. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करा

कोलेस्टेरॉलच्या पातळीची नियमित तपासणी करा. नियंत्रित करण्यासाठी चांगला आहार घ्या.

4. रक्तातील साखरेचे नियंत्रण

रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने यकृताच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यासाठी आरोग्याची काळजी घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनिल तटकरेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले...

Char Dham Yatra: चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी, व्हीआयपी दर्शनही बंद; सरकारकडून नवा आदेश जारी

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT