Curd Rice Recipe: उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, झटपट बनवा साउथ इंडियन स्टाइल दही बुत्ती

Dahi Bhat Benefits in Marathi: उन्हाळा आला की, डिहायड्रेशनसोबतच आपल्याला पोटाचे विकारही सहन करावे लागतात. उष्णतेमुळे आपल्याला फारसे अन्न जात नाही तसेच ते पचत ही नाही. उन्हाळ्यात पोटाला गारवा मिळावा असं काहीतरी आपल्याला खावेसे वाटते.
Curd Rice Recipe: उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, झटपट बनवा साउथ इंडियन स्टाइल दही बुत्ती
Dahi Bhat Benefits in MarathiSaam Tv

South Indian Style Dahi Butti Recipe:

उन्हाळा आला की, डिहायड्रेशनसोबतच आपल्याला पोटाचे विकारही सहन करावे लागतात. उष्णतेमुळे आपल्याला फारसे अन्न जात नाही तसेच ते पचत ही नाही. उन्हाळ्यात पोटाला गारवा मिळावा असं काहीतरी आपल्याला खावेसे वाटते.

या काळात आपल्याला शरीराला आणि पचनशक्ती सुरळीत ठेवण्यासाठी दही किंवा ताकाचा वापर करतो. दही हे पचायला हलके आहे. त्याचे सेवन केल्याने पोटाला आराम मिळतो. यात असणारे कॅल्शियम, प्रोटीन्स पचनक्रिया मजबूत करते. या उन्हाळ्यात तुम्ही आरोग्याला फायदेशीर ठरणारा साउथ इंडियन पद्धतीचा दही बुत्तीची रेसिपी (Recipe) ट्राय करु शकता.

Curd Rice Recipe: उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, झटपट बनवा साउथ इंडियन स्टाइल दही बुत्ती
Fruit Custard Recipe: उन्हाळात सोप्या पद्धतीने बनवा फ्रुट कस्टर्ड, पोटाला मिळेल गारवा

1. साहित्य

  • तांदूळ १ कप | Rice 1 Cup

  • पाणी ३ कप | Water 3 Cups

  • दही १.५ कप | Curd 1.5 Cup

  • दूध ३/४ - १ कप | Milk ¾ - 1 Cup

  • एकदम बारीक चिरलेले आले १ इंच | Finely Chopped Ginger 1 inch

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची १-२ | Finely Chopped Green Chiles 1-2

2. फोडणीसाठी | For Tadaka

  • साजूक तूप / तेल २ tbsp | Ghee or oil 2 tbsp

  • मोहरी १/२ tsp | Mustard Seeds ½ tsp

  • उडीद डाळ १/२ tsp | Urad Daal ½ tsp

  • लाल सुक्या मिरची ३-४ | Dry Red Chilies 3-4

  • हिंग १/२ tsp | Asafoetida ½ tsp

  • कढीपत्ता १०-१२ | Curry Leaves 10-12

  • बारीक चिरलेली कोथिंबीर | Chopped Fresh Coriander

Curd Rice Recipe: उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, झटपट बनवा साउथ इंडियन स्टाइल दही बुत्ती
Kairi Panha Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा कैरीचं पन्हं; पाहा रेसिपी

3. कृती

  • तांदूळ चांगले धुवा आणि १५ मिनिटे भिजवा. भिजल्यावर तांदूळातील जास्तीचे पाणी गाळून घ्या.

  • कढईत ३ कप पाणी गरम करा आणि उकळी आणा, पाणी उकळायला लागल्यावर मीठ घाला आणि चांगले मिसळा.

  • मंद आच ठेवा आणि त्यात भिजवलेले तांदूळ चांगले मिसळा. उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा, झाकून ठेवा आणि भात शिजवून घ्या.

  • भात शिजला की गॅस बंद करा. भात थंड झाल्यावर त्यात दही घालून चांगले मिक्स करा.

Curd Rice Recipe: उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, झटपट बनवा साउथ इंडियन स्टाइल दही बुत्ती
Mango Ice-cream Recipe : उन्हाळ्यात चव चाखा आंब्याच्या आइस्क्रीमची, घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी

4. तडका साठी -

  • कढईत तूप गरम करा. त्यात मोहरी घाला आणि तडतडू द्या, नंतर उडीद डाळ घाला.

  • नंतर लाल मिरच्या, हिंग, कढीपत्ता घालून परतावे.

  • हा फोडणी दही भातामध्ये घाला आणि चांगले मिसळा. केरळी पापड, तळलेली मिराची सोबत सर्व्ह करा दही बुत्ती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com