कोमल दामुद्रे
उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला सतत काही ना काही थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते.
जर तुम्हालाही थंड आणि हेल्दी पदार्थ खायचा असेल तर फ्रुट कस्टर्ड बनवून खाऊ शकता. पाहूया रेसिपी
कस्टर्ड पावडर- ४ चमचे, दूध - ४ कप, साखर - १/२ कप, सफरचंद - १ कप, द्राक्षे -१/२ कप, चिकू - १/२ कप, केळी- १/२ कप, डाळिंबाचे दाणे - १/२ कप
सर्वात आधी मोठ्या बाउलमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यात दूध घालावे.
दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्रित मिसळून घ्यावे. हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.
दूध एका भांड्यात घेऊन व्यवस्थित उकळवून घ्या.
दूध व्यवस्थित उकळवून घेतल्यानंतर साखर आणि कस्टर्ड पावडरचे मिश्रण घाला.
हे मिश्रण १० ते १५ मिनिटे मंद आचेवर हलकेच गरम करुन घ्या.
हे मिश्रण संपूर्णपणे गार झाल्यानंतर त्यात आवडीनुसार फळे घाला. कस्टर्ड थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये २ ते ३ तासांसाठी ठेवून द्या.